जेंव्हा आपल्याला वाटतं दुसऱ्याचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप बेटर चाललंय त्यांच्यात जेव्हा प्रोब्लेम्स होतात ४ भिंतींत भांडतात तेंव्हा
तेजश्री प्रधान ही गेले अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. मालिका, चित्रपट तसेच नाटक अशा तिन्ही माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवडक प्रोजेक्टमध्येच काम करत असल्याने तिला स्वच्छंदी अभिनेत्री म्हटले गेले आहे. स्टार प्रवाहवरील गोष्ट प्रेमाची या मालिकेत सध्या ती मुक्ताची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तेजश्रीला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. सध्या या मालिकेत मुक्ता आणि सागरची लगीनघाई सुरू आहे. मालिकेव्यतिरिक्त तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी तिला सोशल मिडिया वापरण्याविषयी तसेच खाजगी आयुष्याबद्दलही अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने त्या प्रश्नांना उत्तरं दिली. आयुष्यात पुन्हा पुन्हा यावं असे काही दिवस असतात पण असे काही दिवस असतात जे आपल्या आयुष्यात स्कीप करावेसे वाटतात , असा तुझ्या आयुष्यातला कोणता दिवस तुला स्कीप करावासा वाटेल? या प्रश्नावर तेजश्री म्हणते की, “तो दिवस मी स्कीप केलाय माझ्या डोक्यातून त्यामुळे मला तो दिवस आठवत नाही आणि असा दिवस जो मला परत यावासा वाटतोय तर तो माझा दिवस त्या दिवसापेक्षा बेटर असावा असं मला वाटतंय.
त्यामुळे मला त्या दिवसाकडे परत जायचं नाहीये.” तेजश्रीच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सहकलाकार आपल्यापेक्षा कधी वरचढ ठरतात किंवा त्यांना आपल्यापेक्षा जास्त यश मिळते तेव्हा ते आपल्यापुढे निघून जातील यावर तेजश्री म्हणते की, ” कलाकारांसोबत आमचं छान बॉंडिंग असतं, आज तू छान दिसतेस, तुझा कालचा सिन खूप छान झाला हे आम्ही एकमेकांना आवर्जून सांगतो. त्यांचा तो मार्ग आहे म्हणून ते पुढे जातात, ते मला टाकून पुढे नाही जात. मला कदाचित माझ्या आयुष्यातली ही संथ गती आहे आणि तो माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तो वेग कोणामुळे कमी नाही झाला. तो वेग आज इथे आहे कदाचित उद्या आणखी पुढे जाईल किंवा आहे तिथेच असेल पण तो माझा आहे. काहितरी वाईट झालं ते ह्याच्यामुळे झालं त्यामुळे ती वाईट आहे हे मी माझ्या आयुष्यात कधीच केलं नाही, आजपर्यंत केलं नाही आणि यापुढेही करणार नाही.जे आहे ते माझ्या नशीबाचं आहे. मला न आवडलेल्या लोकांना मी ब्लेम करून त्यांना मोठंही करणार नाही, कारण आपल्या आयुष्यात एखाद्याने कंट्रोल द्यावा इतकं कुणीच देव नाहीये.” सोशल मीडियावर सगळेच त्यांचे छान छान व्हिडीओ आणि फोटो टाकत असतात पण त्यामागचं सत्य कोणालाच माहीत नसतं.
त्यामुळे त्याला जास्त सिरीयस घ्यायचं नाही, याबद्दल तेजश्री म्हणते की, ” या सोशल मीडियावर मूड ऑफ असतो तेव्हा आमचाही असतो , आम्ही मेकअप काढतो तेव्हा माझाच मी बॉय म्हणून खपेल इतकी वाईट दिसते मी कधीतरी ह्या अवस्थेत असताना मी सेल्फी काढून पोस्ट नाही करत कधी. त्यामुळे प्लिज तुमच्या माणसांना सांगा की हे मृगजळ आहे ना की अरे हिचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप बेटर चाललंय!…वाव ते कपल किती छान आहे त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स नाहीयेत!, तर त्यांना सांगा की त्यांच्यात प्रॉब्लेम्स होतात आणि ते चार भिंतीच्या आत भांडतात आणि अत्यंत वाईट रुपात एकमेकांसमोर असतात तेव्हा ते व्हिडिओ बनवून पोस्ट नाही करत. तुला जर वाईट वाटत असेल आणि तुला सांगितलं ना की फोटो काढायचाय तर तू लगेच केसात हात घालून स्वतःला सावरतेस कारण सोशल मीडियावर तू बरी दिसविस. हे बरं दिसण्यासाठी जे केलं जातंय ना हे आयुष्य नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावरच्या पोस्ट बघून याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं चाललंय आणि माझं कसं वाईट चाललंय हे ठरवू नका. कदाचित त्यांनी डोळे पुसले असतील आणि फोटोपुरता तो तयार झाला असेल . असं आयुष्य परफेक्ट होत नसतं”.