अशोक मा. मा. मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एन्ट्री… अशोक सराफांच्या आवडत्या मालिकेत हिनेच साकारली होती प्रमुख भूमिका
मराठी मालिका सृष्टीत अनेक आश्चर्यकारक बदल घडून येत आहेत. कारण एक काळ गाजवलेले बरेचसे मराठी कलाकार आता पुन्हा एकदा मालिका सृष्टी गाजवत आहेत. कलर्स, झी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांनी टीआरपी वाढावा म्हणून अमेक बदल केले आहेत. खरं तर मराठी बिग बॉसमुळे कलर्सचा टीआरपी परत आलेला पाहायला मिळाला. अगदी टॉप ५ च्या घरात या शोने स्थान मिळवल्याने झी मराठीलाही कलर्सने तगडी टक्कर दिलेली पाहायला मिळाली. त्यात आता चक्क अशोक सराफच कलर्स मराठीवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे अशोक मा. मा. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार आहेत.

या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा नेहा शितोळे देखील मालिकेचा भाग असणार असे समजले होते. पण आता याच मालिकेत कलर्स मराठीच्या गाजलेल्या मालिकेची नायिका देखील झळकणार आहे. महत्वाचं म्हणजे अशोक सराफ यांना कलर्स मराठीची ही एकमेव मालिका बघायला खूप आवडायची. हे जेव्हा मालिकेच्या कलाकारांना कळले होते तेव्हा स्वतः तेजश्री प्रधान हिने अशोक सराफ यांच्या घरी त्यांची भेट घडवून आणली होती. ‘ती परत येतेय’ असे कॅप्शन या नायिकेच्या एंट्रीवर दिल्याने ती नक्की आहे तरी कोण? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. पण बऱ्याच प्रेक्षकांनी या नायिकेला ओळखले आहे. ही अभिनेत्री आहे रसिका वाखरकर. रसिकाने याअगोदर कलर्सच्या पिरतीचा वणवा उरी पेटला मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

या मालिकेने रसिकलास चांगली लोकप्रियता मिळाली होती. मेकअप, साईड मिरर, अथांग अशा प्रोजेक्टनंतर तिला छोट्या पडद्द्यावरही ओळखले जाऊ लागले. ही मालिका अशोक सराफ यांना खूप आवडत होती. म्हणूनच त्यांनी या मालिकेच्या कलाकारांना घरी आमंत्रण दिले होते. पण आता आपल्या याच लाडक्या चाहत्यासोबत रसिकाला काम करण्याची संधी मिळाली आहे..अशोक मा. मा. या मालिकेत रसिका एका स्टायलिश भूमिकेत पहायला मिळणार आहे. तिची पाठमोरी झलक प्रेक्षकांच्या समोर आली असून ही रसिकाच आहे याची खात्री प्रेक्षकांनी दिली आहे.



