सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेत्रीने ४ वर्षाच्या संसारानंतर अभिनेत्याला दिला घटस्फोट आणि थाटला दुसरा संसार

झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागली आहे. सावली आणि सारंग एकत्र येत असतानाच आता सावली तिचं सत्य समोर येईन म्हणून सारंग पासून दूर जाताना दिसत आहे. अमृता वहिनी या दोघांना एकत्र आणण्यासाठी नेहमी प्रयत्नात असते. त्यामुळे अमृताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अमृता वहिनीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

अमृताची भूमिका अभिनेत्री मानसी नाईक हिने साकारली आहे. मानसी नाईक गेली अनेक वर्षे मालिका सृष्टीत कार्यरत आहे. पण मानसी नाईकच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार आलेले पाहायला मिळाले. मानसी नाईकने लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारीसोबत पहिल्यांदा लग्नगाठ बांधली होती. पण अवघ्या ४ वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. छोट्या पडद्यावरचा देखणा नायक अशी अक्षर कोठारीची ओळख आहे. त्याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. स्वाभिमान, कमला, छोटी मालकीण, चाहूल अशा मालिकेतून तो दमदार भूमिका साकारताना दिसला होता. अभिनेत्री मानसी नाईक सोबत काम करताना अक्षर तिच्या प्रेमात पडला.

दोघांनी लग्नही केले. पण लग्नानंतर अवघ्या ४ वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला. २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं अशा भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. दरम्यान घटस्फोटानंतर मानसी नाईकने धृवेश कापुरीया सोबत दुसरे लग्न केले. पण अक्षर कोठारी मात्र अजूनही सिंगल आहे. सध्या स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पावलांची मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.मानसी आणि अक्षरने लग्नानंतर चाहूल २ या मालिकेत एकत्रित काम केले होते. मानसी नाईक हिने गणपती बाप्पा मोरया, चाहूल २, शाब्बास सुनबाई! अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सावळ्याची जणू सावली मालिकेत ती सहाय्यक भूमिकेत दिसत असली तरी तिची ही भूमिका सकारात्मक असल्याने प्रेक्षकांच्या ती पसंतीस उतरली आहे.