news

‘ही सून आहे का’ विचारलेल्या प्रश्नावर पत्नीने दिल हे उत्तर … हास्यजत्रा फेम अरुण कदम यांचा तो फोटो होतोय व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले. २० ऑगस्ट रोजी अरुण कदम यांची एकुलती एक लेक सुकन्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. नातवाच्या जन्मानंतर काही दिवसातच मोठ्या थाटात त्याचे बारसे करण्यात आले. यावेळी अरुण कदम आणि पत्नी वैशाली कदम यांनी त्यांच्या नातवाच्या बारश्याचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला. अरुण कदम आणि वैशाली हे दोघेही आजी आजोबा बनले तेव्हा त्यांचे चाहत्यांनी विशेष अभिनंदन केले. अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली या दिसायला अतिशय यंग असल्याने त्या सुकन्याची बहीण वाटतात अशी प्रतिक्रिया त्यांना मिळू लागली. पण काहीच दिवसांपूर्वी एका चाहत्याने त्यांच्या सोहळ्यातील एका व्हिडिओवर एक कमेंट केलेली पाहायला मिळाली.

arun kadam family photo
arun kadam family photo

‘ही सून आहे का’ असा प्रश्न एका युजरने विचारताच अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली यांनी या कमेंटरवर उत्तर देण्याचे ठरवले. ‘बायको आहे.’ अशी वैशाली कदम यांनी प्रतिक्रिया देताच पुन्हा त्या युजरने आश्चर्यचकित होत त्यांना सॉरी म्हणत, ‘ तुम्ही एवढ्या यंग दिसता म्हणून’. अशी पुन्हा एक प्रतिक्रिया दिली. अर्थात अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम या फारशा कधी मिडियासमोर आल्या नाहीत त्यामुळे अरुण कदम यांच्या त्या पत्नी आहेत हे बहुतेकांना परिचित नाही. शिवाय वैशाली या दिसायलाही छान आहेत त्यामुळे त्या अरुण कदम यांची सून असावी असा समज त्या युजरने करून घेतला होता. दरम्यान अरुण कदम यांची कारकीर्द भरास येत असतानाच त्यांनी वैशाली सोबत लग्न केले होते. अरुण कदम त्यावेळी सरकारी नोकरी करत होतेच सोबत ते मालिका, चित्रपट नाटकातूनही काम करत होते. एका मित्राने त्यांना वैशालीचे स्थळ सुचवले होते.

arun kadam wife vaishali kadam
arun kadam wife vaishali kadam

पाहण्याच्या कार्यक्रमातच वैशाली यांनी अरुण कदम यांना होकार दिला होता. पण वैशाली एवढी देखणी आणि आपण असे असूनही वैशालीने आपल्याला होकार का दिला हे जाणून घेण्यासाठी अरुण कदम यांनी वैशालीसोबत एक भेट ठरवली. तेव्हा वडील ज्या मुलाला पसंत करतील त्याच्याशी मी लग्न करणार हे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर अरुण कदम आणि वैशालीचे मोठ्या थाटात लग्न झाले होते. वैशाली कदम यांचे राहणीमान खूपच छान आहे त्यांच्या साड्यांचे कलेक्शन देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे अनेकजण त्यांच्या साड्यांच्या कलेक्शनबद्दल चौकशी करत असतात. त्यांच्या या फॅशन सेन्सचे त्यांचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button