‘नानाची वाडी’ नाना पाटेकर यांचं फार्महाऊस पाहिलं का? घराभोवती फळा फुलांची झाडं जनावरांसाठी गोठा आणि भली मोठी

अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी सृष्टीतही स्वतःची ओळख बनवली आहे. मुंबईची गर्दी आणि उंच उंच इमारती पाहून त्यांची घुसमट व्हायची. त्याचमुळे गेल्या १५ वर्षांपासून ते पुण्यातील त्यांच्या कुटुंबासह शेतघरात राहायला गेले आहेत. ‘नानाची वाडी’ या नावाने त्यांचं पुण्यातील खडकवासला येथील डोणजे या गावात शेतघर आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या ७ ते ८ एकर क्षेत्रावर त्यांनी ही शेती केली आहे.

इथे तांदूळ, हळद अशी पिकं ते घेतात.भली मोठी विहीर, घराच्या परिसरात असलेले सिमेंटचे रस्ते, दगडी बांधकाम असलेलं भलं मोठं शेतघर, घराभोवती फळा फुलांची झाडं, जनावरांसाठी गोठा अशी रचना त्यांनी करून घेतली आहे. त्यांच्या या शेतघराची अनेक सेलिब्रिटींना भुरळ पडली आहे तर राजकीय नेत्यांनीही इथे हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

त्यांची खासियत म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, मित्राला जेवू घातल्याशिवाय नाना त्यांना जाऊ देत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या ‘गिरीजा’ गाईला वासरु झालं तिचं नाव त्यांनी ‘जनी’ ठेवलं. त्यामुळे त्यांची दिवाळीची सुरुवात वसूबारसेने झाली. नाना पाटेकर यांचं हे शेतघर पाहून तुम्हाला कसं वाटल कमेंट करून नक्की सांगा..
