साधारण १५ दिवसांपूर्वी लाखात एक आमचा दादा मालिका अभिनेता ‘स्वप्नील पवार’ याने त्याच्या आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदत मागितली होती. गेल्या ३ महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये स्वप्नीलची आई सौ उज्वला पवार या उपचार घेत होत्या. ब्रेन स्ट्रोक असल्याने त्यांच्यावर १० सर्जरी करण्यात आल्या होत्या त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. होते नव्हते तेव्हढे जवळचे सर्व उपचारासाठी लागल्याने पुढच्या सर्जरीसाठी पैसे कुठून उभारावेत? हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे आ वासून उभा होता.
शेवटी सोशल मीडियावर त्याने चाहत्यांना मदतीचे आवाहन केले तेव्हा सेलिब्रिटीही त्याच्या मदतीला धावून आले. अखेर उपचारानंतर स्वप्नीलची आई सुखरूप घरी पोहोचली आहे. इतक्या दिवसांच्या अजरपणामुळे त्या अजूनही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाही मात्र स्वप्नीलच्या वाढदिवशी त्याचे औक्षण करता आले नाही म्हणून आता त्यांनी आधार घेऊन त्याचे औक्षण केलेले पाहायला मिळत आहे. ” माझ्यासाठी देवानं दिलेलं हे सर्वात मोठं वरदान आहे!” अशी प्रतिक्रिया तो यावर देताना दिसतो आहे. संपूर्ण बातमी – आईच्या उपचारासाठी लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेत्याला हवीय मदत… मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले