आईच्या उपचारासाठी लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेत्याला हवीय मदत… मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले
सोशल मीडियाचा वापर आता वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ लागला आहे. या माध्यमातून लोकांच्या अडचणी जाणून घेता येऊ लागल्या. अशाच माध्यमातून एका मराठी अभिनेत्याने तातडीची मदत मागितली आहे. लाखात एक आमचा दादा, मुलगी झाली हो मालिका अभिनेता स्वप्नील पवार याने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या होत्या. गेली अनेक वर्षे तो मराठी सृष्टीत काम करतो आहे. पण आता स्वप्नील त्याच्या चाहत्यांना मदत मागताना दिसत आहे. स्वप्नीलची आई सौ उज्वला पवार या गेले ३ महिने पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक असल्याने ३ महिन्यात १० सर्जरी करण्यात आल्या. एक मोठी सर्जरी करण्यासाठी २९ लाख रुपयांची त्याला गरज आहे. जवळ असलेले सगळे सेव्हिंग आता उपचारासाठी खर्च झाले.
त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर करून मदत मागितली आहे. या पोस्टमध्ये तो आईचा फोटो शेअर करताना म्हणतो की, “मी स्वप्निल संजय पवार खरतर हा मॅसेज लिहिण्याची वेळ कधी येईल असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण प्रश्न माझ्या आईच्या उपचारांचा आहे म्हणुन मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतोय….माझी आई सौ. उज्वला संजय पवार हि गेले ३ महिने हॅास्पिटलमध्ये Admit आहे, तिच्यावर brain stroke या आजारावर उपचार सुरु आहेत. सध्या ती दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल, पुणे येथे उपचार घेत असून या ३ महिन्यांनमध्ये तिझ्यावर वेगवेगळ्या अश्या १० surgeries झाल्या आहेत ज्याचा खर्च जवळ जवळ २९ लाख रू. झाला आहे.
कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च सेव्हिंग मधून केला आहे. तुम्हाला शक्य होईल तितकी मदत करा”. असे म्हणत स्वप्नीलने त्याच्या या पोस्टमध्ये अकाउंट डिटेल्स दिले आहेत. स्वप्नीलच्या या पोस्ट नंतर मराठी सृष्टीतील त्याची मित्रमंडळी मदतीसाठी पुढे सारसावली आहेत. गुगल पे वर लिमिट्स असल्याने काहींना इच्छा असूनही त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचत नव्हती तेव्हा स्वप्नीलने आता त्याचा बँकेचा अकाउंट नंबर शेअर केला आहे. या मदतीसाठी स्वप्नीलने त्यांचे आभार देखील मानले आहेत.