त्याची २ लग्न होऊनही तू त्याच्याशी लग्न केलं म्हणून ट्रोल होणाऱ्या सुरुचीने सांगितलं पियुषसोबत लग्न गाठ बांधण्याचं कारण
६ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेत्री सुरुची अडारकर हिने अभिनेता पियुष रानडे सोबत लग्नगाठ बांधली. खरं तर त्यांचे हे लग्न पाहून अनेकांना आश्चर्याचा एक सुखद धक्काच बसला. कारण दोनदा घटस्फोट घेणाऱ्या पियुषसोबत सुरुचीने लग्न का केले? आयुष्याचा जोडीदार म्हणून तिने त्याची निवड का केली असावी? असा प्रश्न सर्वांनाच पडला. पियुष रानडे हा सुरुची सोबत तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला तर सुरुचीचे हे पहिलेच लग्न आहे. अभिनेत्री शाल्मली तोळे आणि मयुरी वाघ यांच्यासोबत पियुषने लग्न केले होते. या दोघींनाही त्याने घटस्फोट दिला होता. त्यामुळे सुरुचीने त्याच्यासोबत लग्न का केले हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावर स्वतः सुरुचिनेच कारण सांगितले आहे.
मीडियाशी बोलताना सुरुची म्हणते की, ” मी खुप आनंदी आहे माझा हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाहीये. माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे की एवढ्या चांगल्या व्यक्तीसोबत माझे लग्न झाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. मी त्याच्यासोबत लग्न करण्याचे कारण म्हणजे तो मनाने इतका चांगला व्यक्ती आहे की मी त्याच्यासोबत लग्न करून खुप खुश आहे. तो खूप भावनिक आणि काळजी घेणारा आहे. मी त्याच्याशी लग्न करून खूप खुश आहे, मला वाटते की मी सर्वात भाग्यवान मुलगी आहे,” असे सुरुचीने या लग्नाबाबत म्हटले आहे. दरम्यान सुरुची अडारकर हिने तिचे पियुषसोबतचे अफेअर सगळ्यांपासून लपवून ठेवले होते याबद्दलही ती म्हणते की,” मी अशी व्यक्ती आहे जीला तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी उघड करायला आवडत नाही. म्हणून मी ह्या गोष्टी खाजगी ठेवल्या होत्या. मी लग्न करतीये हे फक्त माझ्या जवळच्याच लोकांना माहिती होते.
” सुरुची लग्न बंधनात अडकतीये हे तिच्या सहकलाकाराना माहीत होते. काही दिवसांपूर्वीच शलाका पवार, अर्चना निपाणकर यांनी तिचे केळवण साजरे केले होते. तर सुरुची आणि पियुषच्या लग्नात भक्ती देसाई, अर्चना निपाणकर, शलाका पवार, श्रेया बुगडे, हर्षद अतकारी यांनी हजेरी लावली होती. झी युवा वरील ‘अंजली- झेप स्वप्नांची’ या मालिकेत सुरुची आणि पियुषने एकत्रित काम केले होते. २०१७ साली या मालिकेचे प्रसारण होत होते. याच काळात पियुष आणि सुरुची सोबत मैत्री झाली. त्यांच्यात प्रेमाचे सूर जुळून आले होते. पण त्यांनी त्यांचे हे नाते सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. त्याचमुळे सुरुची पियुषसोबत लग्न करतीये हे मराठी सृष्टीतील काही मोजक्याच कलाकारांना ठाऊक होते. त्याचमुळे आता कालपासून ह्या लग्नावर अनेकांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत.