मी १८ वर्षांची असताना ते दोघे वेगळे झाले तेव्हा मी खुश झाले कारण …आई वडिलांच्या सततच्या भांडणावर क्षिती जोगचं मत

अभिनेत्री क्षिती जोग हिने काही दिवसांपूर्वी पॉडकास्टला मुलाखत दिली होती. तेव्हा तिने तिची अनेक रोखठोक मतं मांडलेली पाहायला मिळाली. खरं तर हा तिचा स्वभाव तिने वडिलांकडूनच घेतला असे ती या मुलाखतीत म्हणते. कारण अनंत जोग हेही एक परखड व्यक्तिमत्त्व आहे. क्षिती आणि त्यांच्यात जर वाद झाले तर ते अगदी टोकाच्या वादापर्यंत जातात असे ती म्हणते. क्षिती ही खूप कमी वयातच एकटी राहू लागली होती. त्यामुळे तिच्या स्वतंत्र विचारांना तिला पुरेसा वाव मिळत गेला. तिचे आईवडील अनंत जोग आणि उज्वला जोग हे दोघेही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत क्षितीनेही अभिनयाची वाट धरली.

पण या प्रवासात तिने आई वडिलांचा टोकाचा वाद देखील अनुभवला होता. सततची भांडणं पाहून तीही खूप वैतागली होती. शेवटी अनंत आणि उज्वला जोग यांनी वेगळं होण्याचा निर्णय त्यावेळी क्षिती केवळ १८ वर्षांची होती. त्यामुळे हे तिघेजण वेगवेगळे राहू लागले. खर तर जेव्हा त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा क्षितीला खूप आनंद झाला होता. कारण जेव्हा दोघांच्या भांडणामुळे आम्ही तीघेही एकत्र राहताना दुःखी आहोत तर मग त्यावेळी सगळ्यांसाठी वेगळं राहणच योग्य होतं. पण इतके वर्ष वेगळे राहूनही आम्ही एकत्र येतो, भेटतो, जेवायला जातो असे क्षिती म्हणते. आता तर तिचे वडील आईच्या हातचं जेवण जेवायला तिच्या घरी आवर्जून हजेरी लावतात, मीही त्यांना भेटत असते असे ती सांगते. एकदा तालमीच्यावेळी एका मैत्रिणीला यायला उशीर झाला म्हणून तिला खूप ओरडा खावा लागला होता.

त्याचवेळी त्यांनी माझं उदाहरण दिलं की ‘एकवेळ तुझं ठीक आहे तू आईबाबांसोबत राहत नाही म्हणून तुला उशीर होतो’ तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती असे ती म्हणते. तेव्हा क्षितीने त्यांना म्हटलं होतं की, ‘ बरोबर आहे पण तुम्ही आता त्यांना फोन करून विचारा की मी कुठं आहे त्यांना ते माहीत असेल…कारण मी एक जबाबदार मुलगी आहे तसेच ते जबाबदार पालक देखील आहेत .मी एकटी राहायचे तेव्हा लोकं सिंपथी द्यायला यायचे, पण मला ते आवडायचं नाही कारण मी एकटं राहू शकत होते. आई सोबत माझं आजही पूर्वी सारखंच भांडण होत , वडिलांसोबतही त्या लेव्हलपर्यंत भांडण गेलं आहे. मी त्या काळात ज्या चुका केल्या त्या ह्या दोघांमुळे केल्या नाही, मी त्या स्वतः केलेल्या आहेत. त्या दोघांना इथे ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही असे क्षिती रोखठोक मत मांडते.