news

हुमा कुरेशीच्या पाया पडल्याने कुशल बद्रिके ट्रोल…चाहत्यांना दिलं पाया पडण्यामागचं स्पष्टीकरण

चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिके आता सोनी टीव्हीच्या मॅडनेस मचाएंगे या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. सुरुवातीला या शोमध्ये कुशलला हेमांगीची साथ मिळाली त्यानंतर आता या जोडीला गौरव मोरेची साथ मिळत आहे. हिंदी सृष्टीत विनोदाचे हे तीन महारथी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदी सृष्टीतही मराठी कलाकारांचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. नुकतेच या शोमध्ये मदर्स डे साजरा करण्यात आला यावेळी हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके ह्या दोघांच्या आईने त्यांनी कौतुकाची थाप दिली. इथपर्यंत येण्यासाठी या दोन्ही कलाकारांनी मोठा संघर्ष केला आहे. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे.

kushal badrike in madness machayenge
kushal badrike in madness machayenge

म्हणूनच इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणून आज हे दोघेही हिंदी सृष्टीत नाव गाजवताना दिसत आहेत. त्याचमुळे हेमांगी कवी आणि कुशल बद्रिकेचे या मंचावर कौतुक करण्यात आले. पण या सर्व कौतुकात कुशल बद्रिकेला मात्र एका चाहत्याकडून ट्रोल व्हावे लागले आहे. नुकतेच या शोच्या मंचावर कुशल बद्रिके याने शोची जज हुमा कुरेशी हिच्या पाया पडल्याचे दिसून आले होते, ते पाहून मात्र एका ट्रोलर्सने कुशलला तिच्या पाया का पडला म्हणून हटकले. तेव्हा चाहत्याच्या या प्रश्नावर कुशलने संयमितपणे उत्तर दिलेले पाहायला मिळाले. या ट्रोलिंगला उत्तर देताना कुशल म्हणतो की, ” मित्रा तुमचा प्रश्न genuine वाटला म्हणून उत्तर देतो. त्या वेळेला, तिथे प्रश्न वयाचा नव्हता, भावनेचा होता.

kushal badrike and huma quereshi
kushal badrike and huma quereshi

मला भरून आलं तेव्हा त्यांना एक बहीण म्हणून मिठी मारावी वाटली हे त्यांच्या संस्कारातून आलंय, आणि माझ्या भावनेची त्यांना कदर करावीशी वाटली म्हणून मी पाया पडलो हे आपल्या संस्कारातून आलंय. आणि सांगू का? माणूस कसा react होतो त्यापेक्षा react होतो हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.” कुशल बद्रिकेच्या या उत्तराने त्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button