सूरज चव्हाणला प्रेक्षकांकडून मोठी लोकप्रियता पण .. मालवणी भाषेवरून ट्रोल झालेल्या वैभवला नेटकऱ्यांनी देखील घेतला खरपूस समाचार
मराठी बिग बॉसचा पाचवा सिजन निक्की तंबोळी, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर यांनी गाजवलेला पाहायला मिळाला. दरम्यान या घरात सूरज चव्हाणला प्रेक्षकांकडून मोठी लोकप्रियता मिळत आहे. जे लोकं सुरजच्या एंट्रीवर त्याला नावं ठेवत होते आज तेच लोकं सुरजच्या खेळाचे आणि एकंदरीत वागणुकीचे मोठे कौतुक करत आहेत. या आठवड्यात सुरजला कॅप्टन व्हायचे होते. त्यामुळे टास्कमध्ये तो चक्क अरबाजला भिडलेला पाहायला मिळाला. त्याच्या याच कामगिरीचं रितेशनेही कौतुक केलेलं पाहायला मिळालं. तर निक्की, आर्या यांना रितेशचा ओरडा खावा लागला. वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वाबद्दल निक्कीने एक वक्तव्य केलं होतं ते या आठवड्यात चर्चेत राहिलं.
पण सतत माफी मागून ती पुन्हा चूकच करतेय हे पाहून रितेशने नाराजी व्यक्त केली. तर वैभवाच्या वक्तव्याचा रितेशने खरपूस समाचार घेतलेला पाहायला मिळाला. ‘मालवणी ही मराठी भाषा नाही ‘ या वैभवाच्या वक्तव्यावत रितेशने त्याची कानउघडणी केली. घरातील सगळे सदस्य विविध भागातून आलेले आहेत त्यांची बोलीभाषा ही वेगवेगळी असली तरी ती मराठीच मानली जाते. वीदर्भीय , मराठवाडा, कोल्हापूर , सांगली इथे सगळीकडे वेगवेगळी बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा प्रत्येकालाच अभिमान आहे. त्यामुळे वैभवच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर नाराजी दर्शवण्यात आली होती. याच अनुषंगाने रितेशने वैभवला त्याची चूक लक्षात आणून दिली. तेव्हा वैभवला त्याची चूक उमगली आणि मी तमाम जनतेची माफी मागतो.
असे म्हणत इथून पुढे अशी चूक होणार नाही याची कबुली दिली. याचवेळी वैभवच्या वक्तव्याचा अंकीताने आक्षेप का घेतला नाही? म्हणूनही तीला जाब विचरण्यात आला. मालवणी ही मराठीच आहे आणि ती महाराष्ट्राची बोलीभाषा आहे असे तू का म्हणाली नाही? असा प्रश्न अंकिताला विचारला. तेव्हा तिने या गोष्टीवर नक्कीच स्टॅण्ड घेईल असे मत व्यक्त केले. एका बाजूला वैभव मालवणी भाषेला मराठी म्हणत नाही तिथेच तो इरिनाला मराठी शिकवताना दिसतो. त्यामुळे आपण जे काही बोलतो ते भान ठेवून बोलायला हवं असं रितेशने सगळ्यांनाच सांगितलं आहे. कुणाच्याही पर्सनल गोष्टीला मध्ये का आणलं जातं, तुम्ही हा खेळ , खेळ म्हणून खेळा असे म्हणत रितेशने काल सगळ्यांचीच कानउघडणी केलेली होती.