news

त्याला असं पाहून मला कसतरी वाटतंय भले त्याला गेम नाही कळला पण…सुरजचा भोळेभाबडेपणा प्रेक्षकांना रडवून गेला

मराठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या मनात जागा बनवताना दिसत आहे. सुरुवातीला सूरज चव्हाणला बिग बॉसने का बोलावले यावरून त्याच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र बिग बॉसच्या घरात आल्याने सूरज खऱ्या आयुष्यात कसा आहे हे लोकांना हळूहळू समजायला लागलं आहे. नुकताच तो बिग बॉसच्या घरात झाडू मारताना पाहायला मिळाला. त्याला असं निरागस पाहून प्रेक्षकांना मात्र रडू कोसळलं. कोणी व्यक्ती एवढा कसा साधा कसा असू शकतो यावरून लोकं भावुक झाली. मराठी बिग बॉसचा सिजन सूरज चव्हाण गाजवत आहे आणि तो या शोचा विजेता व्हावी अशी प्रामाणिक इच्छा सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.

suraj chavan in bigboss marathi home
suraj chavan in bigboss marathi home

झाडू मारणं, भांडी घासणं ही कामं सूरज निःसंकोच मनाने करतो आहे. त्यामुळे त्याचा हा स्वभाव घरातल्यांनाही रडवून गेला आहे. अंकिता, पॅडी आणि धनंजय गार्डन एरियात बसले असताना सूरज झाडू मारतो ते पाहून तिघेही त्याच्या कामाचं कौतुक करतात. ‘मी वर झोपतो तुम्ही खाली झोपता हे पाहून लई वाईट वाटतं’ असं तो पॅडीजवळ म्हणाला होता. तेव्हा अंकिता त्याच्याकडे बघून म्हणते की, ” भले त्याला गेम नाही कळला पण त्याला माणसं कळली”. तिच्या या वाक्यावर भावनिक व्हायला होतं. त्याचमुळे प्रेक्षक सुरजला विजेता बनवण्यासाठी सर्वांना त्याला मत देण्याची विनंती करत आहेत.

सूरज चव्हाण हा अतिशय साधा मुलगा आहे. वेडेवाकडे तोंड करून तो सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळतो. पण या त्याच्या प्रसिध्दीचा अनेकांनी गैरफायदा घेतला. सुरजला लिहिता वाचता येत नाही त्याला समाजात वावरण्याचे ज्ञान नाही म्हणून डीपीने त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता वालावलकरची भेट घेण्याचा सल्ला दिला. ती तुला फसवणार नाही उलट तुला पैसे कसे मिळवायचे हे ती शिकवेल असे डीपी त्याला म्हणाला. एवढंच नाही तर कोणी तुला उकसवायचा प्रयत्न करेल पण तू कोणावर हात उचलायचा नाही, नाहीतर तुला बिग बॉस बाहेर काढतील अशीही समज दिली. त्यामुळे या भोळ्याभाबड्या सुरजने बिग बॉसचे विजेतेपद जिंकावे आणि एका सामान्य माणसाला त्याचा फायदा व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button