मी शाळेत असताना फटाके न घेता गावात पैसे गोळा करून…. फटाके बनवण्यासाठी कित्येक बालमजूरांचे शोषण होते त्यांचा जीव
काही दिवसांपूर्वीच अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. यावर्षी जास्त प्रदूषण असल्याने फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती करणारी एक पोस्ट त्यांनी शेअर केली होती. यावरून वैभव मांगले प्रचंड प्रमावर ट्रोल झाले होते. यापाठोपाठ मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी भावे हिनेही अशाच आशयाची पोस्ट लिहिल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सुरभी सोनी मराठीवरील राणी मी होणार या मालिकेत झळकली आहे. याअगोदर तिने भाग्य दिले तू मला, स्वामिनी, पावनखिंड, अस्मिता, तू माझा सांगाती, माझे पती सौभाग्यवती, तुला पाहते रे अशा चित्रपट, मालिकेतून काम केले आहे. सुरभिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिली होती.
त्यात तिने म्हटले होते की, “दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने एक आवाहन हवेत आधीच खूप प्रदूषण आहे त्यात फटाके वाजवून भर टाकण्या पेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन ,उत्तम सिनेमा ,उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो …” पुढे सुरभी ताजा कलम मध्ये असेही म्हणते की, “आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांचा साठी मी 4थी मध्ये असताना कारगिल युद्ध झालेल त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिलेले तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण लावलेली नाही .” सुरभिने प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्याने तिला प्रचंड प्रमाणावर ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. हे पाहून सुरभिने आणखी एक पोस्ट लिहिली.
त्यात तिने म्हटले की, “माझा मूळ मुद्दा न कळताच अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली … माझ्या आधीच्या पोस्ट ला उगाच ट्रोल करून timepass करणाऱ्यानो अकलेचे रॉकेट उडवा आणि विचारांचे अनार उडवा … आणि हो लवकर डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना ती सोडून बघा जग सुंदर दिसेल.” सुरभिचे म्हणणे एवढेच होते की फटाके बनवण्यासाठी कित्येक बालमजूरांचे शोषण केले जाते. त्यांना मृत्यूही उदभवतो. अशात धर्माचा कुठेच मुद्दा येत नाही आणि हा काम मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट देखील नाही असे सुरभिने ट्रोलर्सना उत्तर देताना म्हटले आहे.