news

मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…. सुप्रिया पिळगावकरांची स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल भन्नाट पोस्ट

रणदीप हुड्डा निर्मित आणि अभिनित “स्वातंत्र्यवीर सावरकर” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट अगोदर महेश मांजरेकर करणार असे ठरले होते. पण कोणी नाराज होऊ नये म्हणून महेश मांजरेकरांनी स्वतः हस्तक्षेप करत चित्रपटात बदल करण्याचे सांगितले. हे रणदीप हुड्डाला कदापि मान्य नव्हते. सावरकर जसे होते तसे ते प्रेक्षकांसमोर यायला हवेत हा त्याचा अट्टाहास होता. हा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून रणदीपने गावची शेती आणि घर गहाण ठेवले आणि चित्रपटासाठी पैसे जमा केले. आज त्याच्या या अथक परिश्रमाला यश मिळत असून अवघ्या तीनच दिवसात प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

supriya pilgaonkar father
supriya pilgaonkar father

रविवारपर्यंत या चित्रपटाने ६.१० कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. त्यामुळे अनेकजण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवत आहेत. त्याच जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा पगडा असलेले शरद पोंक्षे यांनी अजून चित्रपट पाहिला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पण लवकरच व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून ते चित्रपट बघणार आहेत आणि चित्रपट कसा आहे यावर उत्तर देणार आहेत. पण त्याअगोदर सुप्रिया पिळगावकर यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचं मत मांडलं आहे. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी लहानपणी वाचलं होतं, याबद्दल त्या म्हणतात की, “मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला माझ्या शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तक दिल होतं. एक जाडजूड पुस्तक होतं ते. सुट्टीच्या शेवटी ते वाचून पूर्ण करणे अपेक्षित होतं, मी वाचायला सुरुवात केली आणि मी वाचन पूर्ण होईपर्यंत ते खाली ठेवू शकले नाही.

supriya pilgaonkar on swatantravir sarvarkar film
supriya pilgaonkar on swatantravir sarvarkar film

वाचनात सुरुवातीला खूप वेळा व्यत्यय आला कारण मी ते पुस्तक वाचून खूप रडत होते, पुस्तकात अर्ध्या वाटेवर असतानाच मी सुन्न झाले होते. . ते पुस्तक काल जिवंत झालं. .माझी जन्मठेप ! पुस्तक. . वीर सावरकर हा चित्रपट. चित्रपट बघण्याची तुम्ही हिम्मत दाखवाल का. ?” अशी त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया या चित्रपटावर दिली आहे. सुप्रिया पिळगावकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी जे सहन केलं ते पाहण्याची हिम्मत कोणामध्ये आहे का? असा प्रश्नच त्यानी इथे विचारला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खरा इतिहास समोर येतोय याबद्दल अनेकांनी नाकं मुरडली आहेत पण हे वास्तव पाहून रणदीप हुड्डाच्या या धाडसाचेही कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button