serials

काल होळी आमच्या आयुष्यात साजिरी परी आली…सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्ती

एकीकडे मराठी सृष्टीत कलाकारांची धुळवड साजरी होत आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला मालिका सृष्टीतील अभिनेत्याने कन्यारत्न प्राप्तीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. “काल होळी पौर्णिमा साजरी झाली….आमच्या आयुष्यात साजिरी गोजिरी परी आली”…असे म्हणत या अभिनेत्यांने त्याचा हा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अभिनेता आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील उदय शिर्के पाटील म्हणजेच अभिनेता संजय पाटील होय. डॅड टू बी असे म्हणत संजयने काही दिवसांपूर्वीच पत्नीचे डोहाळजेवणाचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यानंतर आता संजय पाटील एका गोंडस परीचा बाबा झाला आहे. मालिकेत त्याने निभावलेले उदयचे पात्र मजेशीर असल्याने त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती.

actor sanjay patil with wife
actor sanjay patil with wife

काही दिवसांपूर्वी या मालिकेने २५ वर्षांचा लिप घेतला. त्यामुळे गौरी आणि जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात आली आहे. याचमुळे मालिकेतील काही जुन्या पात्रांची एक्झिट करण्यात आली आहे. पुनर्जन्माच्या कथेत संजयला काम मिळणार असे त्यावेळी बोलले जात होते. या अफवेवर संजयने तूर्तास तरी मालिकेतून एक्झिट घेतल्याचे स्पष्ट केले होते. मार्च २०२२ मध्ये संजय पाटील हा अबोली सोबत विवाहबद्ध झाला होता. एका शॉर्टफिल्मच्या निमित्ताने तो नाशिकला गेला होता. तिथेच सेटवर त्याची अबोलीसोबत ओळख झाली होती. अबोली ही लेखिका आहे. ‘ चिरंजीव’ या पुस्तकाचे तिने लेखन केले आहे. यासोबतच ती योगा ट्रेनर देखील आहे. योगाच्या निमित्ताने दोघे एकमेकांना फोनवर बोलू लागले होते. पण लॉक डाऊनच्या दरम्यान दोघांची मैत्री वाढत गेली. आणि यातच त्यांच्यात प्रेमाचे सूर जुळून आले . संजय पाटील हा गिरगावात लहानाचा मोठा झाला.

sukha mhanje nakki kay ast actors daughter
sukha mhanje nakki kay ast actors daughter

शाळेत असल्यापासूनच तो विविध मंचावर नृत्याचे सादरीकरण करायचा. देवेंद्र पेम यांच्या अभिनय कार्यशाळेत त्याने प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. शॉर्ट फिल्म, सुकन्या , विठू माऊली अशा मालिकांमधून त्याला कामं मिळत गेली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर संजय पूर्ण वेळ पत्नीसोबत घालवताना दिसत आहे. अनेकदा तो पत्नी अबोलीसोबत रिल्स बनवताना देखील पाहायला मिळाला होता. काल रविवारी होळीच्या दिवशी अबोली आणि संजयला कन्यारत्न झालं. या आनंदाच्या क्षणाचा गोंडस फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर आता सेलिब्रिटींनीही दोघांना कन्यारत्न प्राप्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button