अवघ्या ५ महिन्यातच मालिकेने गुंडाळला गाशा… चांगली मालिका असूनही प्रेक्षक साथ देत नाही तर दुसरीकडे किळसवाण्या मालिका असूनही
प्रेक्षकांचा प्रतिसाद कुठेतरी कमी पडतो तेव्हा मालिकेचा टीआरपी देखील खाली घसरतो. परिणामी अशा मालिकांना चांगले कथानक असूनही प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही दिवसांत मालिकेत घडत असलेले हे बदल सर्वस्वी प्रेक्षकांवरच अवलंबून असलेले पाहायला मिळत आहेत. कारण जेव्हा टीआरपी मिळत नाही तेव्हा मात्र मालिकेला गाशा गुंडाळण्याखेरीज दुसरा कुठलाच मार्ग नसतो. गेल्याच काही दिवसांपूर्वी अंतरपाट या मालिकेने अवघ्या दोन महिन्यातच गाशा गुंडाळला होता. त्यापाठोपाठ आता कलर्स मराठीच्या मालिकेनेही प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे.
छोटासा प्रवास संपला म्हणत.. कलर्स मराठीवरील सुख कळले या मालिकेच्या कलाकारांनी एकमेकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसली. अभिनेता सागर देशमुखने या मालिकेत माधवचे पात्र साकारले होते. २२ एप्रिल २०२४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. त्यानंतर मालिकेच्या कथानकात ट्विस्ट आला आणि सागर देशमुखची मालिकेतून एक्झिट झाली. त्याची जागा आशय कुलकर्णीने घेतली तेव्हा मालिका एका वेगळ्या वळणावर गेलेली पाहायला मिळाली. पण आता अवघ्या ४ ते ५ महिन्यातच सुख कळले या मालिकेचा गाशा गुंडाळलेला पाहायला मिळत आहे.
स्पृहा जोशीने ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि वाहिनीचे हेड केदार शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान मालिका अशाच लवकर संपवल्या जाव्यात, मालिकेच्या कथानकात वाढ करण्यापेक्षा ती तिथेच थांबवलेली बरी अशी मतं व्यक्त करण्यात येऊ लागली आहेत त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांनी वाहिनीचे आभार मानले आहेत. पण दुसरीकडे कित्तेक वर्षानुवर्षे किळसवाण्या मालिका अजूनही चालूच आहेत एक प्रेक्षक म्हणून आम्हाला त्याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया जाणकार प्रेक्षकांकडून येताना येताना पाहायला मिळत आहे.