बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपट सृष्टीत AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक बदल घडवून आणले जात आहेत. आता असाच काहीसा प्रयत्न मराठी सृष्टीत देखील अनुभवायला मिळणार आहे. महेश कोठारे यांनी त्यांच्या झपाटलेला ३ या चित्रपटात अशी टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणणं शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठी चित्रपट सृष्टीनंतर आता मराठी मालिका सृष्टीतही असा इतिहास घडणार आहे. कारण लवकरच सुबोध भावे या टेक्नॉलॉजीमधून वीस पंचवीस वर्ष मागे जाणार आहे. हो हो तुम्ही बरोबर वाचलं. AI या टेक्नॉलॉजीचा वापर आता मराठी मालिकेतून होणार आहे.
सोनी मराठी या वाहिनीवर “तू भेटशी नव्याने” ही मालिका प्रसारित होणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सुबोध भावे या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तुला पाहते रे या त्याच्या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सुबोध भावे मालिकेकडे वळलेला पाहायला मिळतो आहे. तू भेटशी नव्याने या मालिकेत शिवानी सोनार त्याची सहनायिका असणार आहे. सुबोध भावे या मालिकेत दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तरुणपणीचा माही आणि त्यानंतरचा अभिमन्यू सर अशा दुहेरी भूमिका साकारण्यासाठी मालिका सृष्टीत एक मोठा बदल घडून येत आहे. सुबोध भावे तरुण दिसण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. मालिका सृष्टीत हे प्रथमच घडत असल्याने एक इतिहास मात्र नक्कीच घडणार आहे. २५ वर्षांपूर्वी माही कसा दिसत होता याची झलक मालिकेच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माही हा कॉलेजकिंग तर त्याच्या उलट अभिमन्यू सर असल्याने असा कुठला प्रसंग घडला ज्यामुळे प्रेमळ माहीचा कडक शिस्तीत बदल झाला.
ही कहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे तू भेटशी नव्याने ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. शिवानी सोनार हिने काही दिवसांपूर्वीच अभिनेता अंबर गणपुळे सोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर शिवानीला पुन्हा एकदा मालिका सृष्टीत झळकण्याची संधी मिळाली आहे. ती ही भूमिका उत्तम निभावणार यात मुळीच शंका नाही. सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकही तेवढेच उत्सुक आहेत. त्यात आता सुभोध AI च्या मदतीने तरुण दाखवण्यात येणार आहे. त्याला अशा रुपात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे.