news

स्टार प्रवाहची हि मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप…आज आहे शेवटचा एपिसोड म्हणत कलाकार भावुक

स्टार प्रवाह वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप १५ च्या यादीत स्थान पटकवताना दिसल्या आहेत. याच जोडीला आता स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या दोन मालिकांना डच्चू दिलेला पाहायला मिळणार आहे. त्यातली एक मालिका आज शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ही मालिका आहे कुन्या राजाची गं तू रानी. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. मालिकेत गुंजा आणि कबिरची लगीनघाई सुरू आहे. मालिकेचा शेवट गोड करत अखेर कबीर आणि गुंजाच्या नात्याला सर्वांनी स्वीकारले आहे. एवढे दिवस हे दोघे त्यांच्या घरच्यांपासून लग्न लपवून ठेवताना दिसले होते. मात्र आता त्यांच्या नात्याचा उलगडा झाल्याने मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे.

kunya raja chi ga tu rani serial last episode
kunya raja chi ga tu rani serial last episode

स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका दाखल होत आहेत. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर कुन्या राजाची गं तू रानी ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतही कथानक बरेचसे पुढे ढकलण्यात आले आहे. मंजुळा ही मंजुळा नसून ती वैदेहीच आहे याचा खुलासा तिच्या आईला होत आहे. तर दुसरीकडे पिहु ही शुभंकरचीच मुलगी असल्याचे डीएनए टेस्ट मुळे मल्हारला समजणार आहे. त्यामुळे मालिकेत बरेचसे सकारात्मक बदल घडून येत आहेत. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

kunya raja chi ga tu rani serial actors
kunya raja chi ga tu rani serial actors

त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. दरम्यान पिहु आणि स्वरा या दोघी मोठ्या गायिका बनून नाव लौकिक करतात असे दाखवण्यात येणार असल्याने, त्याच जोडीला मालिकेचा टीआरपी रेट देखील चांगला असल्याने तूर्तास तरी ही मालिका निरोप घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान गुंजा आणि कबीर यांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षक नक्कीच मिस करतील अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button