news

शुटिंगचा पहिला दिवस लेकाला शुभेच्छा देताना मनसे नेत्याची भावुक पोस्ट…१ दिवस आम्हाला तुझं नाव डायरेक्टर किंवा

इंडस्ट्रीत काम करत असताना आपल्याही मुलाने या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे अशी कलाकारांची इच्छा असते. अभिनेत्याच्या मुलाला अभिनय जमतोच असे नाही पण त्याने दिग्दर्शक, एडिटर म्हणून पाऊल उचलावे अशी एक माफक अपेक्षा ठेवली जाते. ही अपेक्षा मनसे नेते अमेय खोपकर यांनीही व्यक्त केली आहे. अमेय खोपकर यांनी आजवर मल्टिप्लेक्स मध्ये मराठी सिनेमांना प्राईम टाइम मिळावा यासाठी मदत मिळवून दिली आहे. याशिवाय त्यांनी ये रे ये रे पैसा, डेट भेट, लय भारी अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. कला क्षेत्रात जवळचा संबंध असल्याने ते नेहमी मराठी कलाकारांच्या बाजूने बोलताना दिसतात.

ameya khopkar family photo
ameya khopkar family photo

अमेय खोपकर यांना अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार आहे यामुळे त्यांना मान ताठ ठेवता येत नाही पण जानेवारी महिन्यातच हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा मी आता ताठ मानेने तुमच्यासमोर येईल अशी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती. दरम्यान आज अमेय खोपकर यांच्या मुलाचे कला क्षेत्रात पाऊल पडले आहे आणि आजच त्यांचा मुलगा ईशान १८ वर्षांचा झाला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी लेकासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “बघता बघता मुलं मोठी कधी होतात कळतंच नाही. आज आमचा ईशान १८ वर्षांचा झाला. वयानी मोठा झालाच पण समजुतीनी मोठा झाला हे खूपच आनंद देणारं. या क्षेत्रात करीअर करायचं तर केवळ माझ्या ओळखीने नाही, तर प्रचंड कष्ट करून स्वतःची ओळख निर्माण करायला हवी.

ameya khopkar son ishan with wife
ameya khopkar son ishan with wife

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button