news

स्टार प्रवाह मालिकेच्या सेटवर इफ्तार पार्टी…गुढीपाडवा विसरले का म्हणून होतायत ट्रोल

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बॉलिवूड सृष्टीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले . सलमान खान, बाबा सिद्धीकी यांची इफ्तार पार्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. बॉलिवूड सृष्टीला या गोष्टी काही नवीन नाहित. पण आता मराठी मालिकेच्या सेटवर सुद्धा इफ्तार पार्टी साजरी केली जाऊ लागली आहे. नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीच्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर ही इफ्तार पार्टी साजरी करण्यात आली होती. मालिकेच्या संपूर्ण टीमने हे सेलिब्रेशन मोठ्या थाटात साजरे केलेले पाहायला मिळाले. मालिकेचा नायक म्हणजेच अभिजित खांडकेकर याने ही पार्टी होस्ट केली होती तर तेजस्वीनी लोणारी, सचिन देशपांडे, कांचन गुप्ते या मालिकेच्या कलाकारांसोबत बॅक आर्टिस्टने देखील ही इफ्तार पार्टी भरपूर एन्जॉय केली.

मालिकेच्या कलाकारांनी या पार्टीचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण एकीकडे हा आनंदाचा क्षण साजरा करत असताना काही नेटकऱ्यांना मात्र इफ्तार पार्टी खटकली आहे. मराठी कलाकार आता आपले मराठी सण विसरून इफ्तार पार्ट्या साजऱ्या करू लागले आहेत अशी टीका त्यांच्यावर करण्यात येऊ लागली. खरं तर मालिका सृष्टीत लवकरच येऊ घातलेल्या गुढी पाडव्याच्या सणाचे महत्व सुद्धा पटवून देण्यात येऊ लागले आहे. काही मालिकांमधून तर त्यादिवसाच्या शुटिंगची पूर्वतयारी देखील सुरू झालेली पाहायला मिळत आहे. होळी असो, दिवाळी असो मालिकेच्या माध्यमातून नव्हे तर सेटवर देखिल हे सेलिब्रिटी सण साजरे करण्यात पटाईत असतात. पण मग सेटवर काम करत असलेल्या काही मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित केली तर त्यात बिघडले कुठे अशीही बाजू काही नेटकरी घेऊ लागले आहेत.

ismail sheikh with tujhech mee geet gaat aahe team
ismail sheikh with tujhech mee geet gaat aahe team

अभिजित खांडकेकर याचा पर्सनल असिस्टंट हा इस्माइल शेख आहे. गेली अनेक वर्षे तो अभिजित खांडकेकर सोबत काम करतो आहे. या दोघांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिजित खांडकेकर याने इस्माईलचा वाढदिवस मालिकेच्या सेटवर साजरा केला होता. याच साथीदारांसोबत काम करत असताना त्यांच्यात भावनिक नातं तयार होत असतं आणि म्हणूनच एक आपुलकीच्या भावनेने सेटवर ही इफ्तार पार्टी सेलिब्रेट करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button