news

स्वामी आपल्यात आहेत दाखवणारा अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल…स्वामींच्या हृदयाजवळ घड्याळ लावताच झाला चमत्कार

स्वामी समर्थांची प्रचिती देणारे अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली वाचली असतील. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला संकटातून वाचवतात अशी एक श्रद्धा भाविकांची असते. पण स्वामींची प्रचिती देणारा एक डिजिटल अनुभव मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध कलाकाराने घेतला आहे. आजकाल स्मार्टवॉच वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. खरं तर वेगवेगळ्या फीचर्समुळे स्मार्टवॉचला आजची तरुण पिढी प्राधान्य देत आहे. या स्मार्ट वॉचमध्ये तुमचा स्ट्रेस देखील मोजण्यात येतो. स्मार्टवॉचच्या स्ट्रेस व्यवस्थापनासाठी एचआरव्ही (हृदय गती परिवर्तनशीलता) निरीक्षणाद्वारे अनेक एखाद्या व्यक्तीच्या तणावाची पातळी मोजली जाते. हेच स्मार्टवॉच वापरून अभिनेता अमित फाटक याने स्वामींची प्रचिती करून दिली आहे.

sant gajanan shegaviche actor amit pathak
sant gajanan shegaviche actor amit pathak

काल गुरुवारचे खास औचित्य साधून अमित फाटकने त्याच्या स्मार्टवॉच मध्ये असलेला स्ट्रेस मोजण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला घराच्या भिंतीवर हा प्रयोग केला. पण त्यानंतर अमितने त्याच्या घरात असलेल्या स्वामींच्या फोटोजवळ ते स्मार्टवॉच नेले. स्वामींच्या हृदयाजवळ स्मार्ट वॉच लावताच हृदयाची गती मोजली जाऊ लागली. अमितने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वामींच्या फोटोजवळ स्मार्टवॉच नेताच ते चालू कसे झाले हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. स्वामी आपल्या जवळ आहेत याची प्रचितीच अमितने त्याच्या या व्हिडिओतून दाखवून दिली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना स्वामी आहेत हा विश्वास बसला आहे. दरम्यान अमित फाटकच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अमित फाटक बद्दल सांगायचं झालं तर तो गेली अनेक वर्षे अभिनेता म्हणून या इंडस्ट्रीत काम करतो आहे. पण सन मराठीवरील ‘संत गजानन शेगावीचे’ या मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. अमितने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने संत गजानन महाराजांची व्यक्तिरेखा सुरेख वठवली होती. मधल्या काळात मालिका पुढे ढकल्ल्याने त्याने या मालिकेतून काढता पाय घेतला होता. पण प्रेक्षकांच्या इच्छेखातर बंद झालेली ही मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्यात येऊ लागली होती. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून अमित या भूमिकेबद्दल खूपच भारावून गेला होता. अमितने बहुतेक मालिकेतून विरोधी भूमिका साकारलेल्या आहेत पण संत गजानन शेगावीचे ही मालिका त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी देणारी ठरली आहे. स्वामींवर अपार श्रद्धा असलेल्या अमितने आज त्याचा एक वेगळाच अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे, हा अनुभव पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button