स्टार प्रवाह वाहिनीची हि मालिका गुंडाळणार गाशा… प्रेक्षकांनी पाठ फिरवायच्या आधीच घेतला मोठा निर्णय
स्टार प्रवाह वाहिनी गेल्या दोन वर्षांपासून टीआरपीच्या स्पर्धेत अग्रेसर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीच्या बऱ्याच मालिकांनी एक्झिट घेतली आहे त्याच जोडीला नवीन मालिकेची एन्ट्री झाली आहे. आता लवकरच या वाहिनीवर आणखी दोन नवीन मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन मालिकांना निश्चितच गाशा गुंडाळावा लागणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका येत्या १८ मार्च पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी असलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गाशा गुंडाळणार असे म्हटले जात आहे. पण आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक आहे. त्या मालिकेच्या कथानकानुसार अजून बरेच एपिसोड होणे बाकी आहे.
त्यामुळे तूर्तास तरी आई कुठे काय करते ही मालिका एक्झिट घेणार नाही असे चित्र दिसत आहे. फक्त झी मराठी वाहिनीने त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी पारू या नव्या मालिकेची एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे पारू मालिकेकडे प्रेक्षक वळू नयेत यासाठी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. तसेही आई कुठे काय करते या मालिकेचे कथानक पाहून प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली होती..त्यामुळे हा टीआरपी राखून ठेवता यावा म्हणून मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान मुरांबा ही मालिकाही दुपारच्या वेळेला शिफ्ट करण्यात आली आहे. त्याच जोडीला स्टार प्रवाह वाहिनी ‘ साधी माणसं ‘ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला गाशा गुंडाळावा लागत आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत शुभंकरची एन्ट्री झालेली आहे. मोनिकाचं सत्य उलगडण्यासाठी शुभंकर या मालिकेत पुन्हा परतला आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आई कुठे काय करते मालिकेत आशुतोष आणि माया तसेच संजना आणि नीरजमुळे एक वेगळाच ट्रॅक सुरू झालेला आहे. त्यामुळे या मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेत बदल होणार की मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.