news

हिंदी मालिका सृष्टी गाजवणारा मराठमोळा चेहरा झी मराठीवर… २ महिन्यांपूर्वी या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत झाला होता विवाहबद्ध

सध्या झी मराठी वाहिनी आणि स्टार प्रवाह वाहिनी यांच्यात टीआरपीच्या स्पर्धेवरून चांगलीच स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. अनेक जुन्या मालिकांना डच्चू देत या वाहिन्या नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. स्टार प्रवाह वाहिनी येत्या काही दिवसात “साधी माणसं”, “घरोघरी मातीच्या चुली” या दोन मालिका प्रसारित करत आहे तर झी मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. काल “पारू” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली तर आज तांत्रिक अडचणींमुळे “शिवा” मालिकेचे प्रसारण झाले आहे. पण आज झी मराठी वाहिनीने त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आणला आणि सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. “पुन्हा कर्तव्य आहे” ही नवी मालिका झी मराठी वाहिनी घेऊन येणार असे अगोदर जाहीर करण्यात आले होते, त्या मालिकेचा पहिला प्रोमो आज प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

punha kartavya aahe serial actor akshay mhatre
punha kartavya aahe serial actor akshay mhatre

‘पुनर्विवाह ‘ या हिंदी मालिकेचा रिमेक असलेली ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे. कारण या मालिकेत चक्क हिंदी मालिका गाजवणारा मराठमोळा चेहरा प्रमुख भूमिका साकारत आहे. अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर हे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अक्षय म्हात्रे हा हिंदी मालिका अभिनेता आहे. पीया अलबेला, ये दिल मांगे मोअर, घर एक मंदिर, इंडिया वाली माँ या मालिकेत अक्षयने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. खरं तर अक्षय म्हात्रे याने ‘सावर रे’ या मराठी मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. ऋजुता देशमुख सोबत त्याने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अक्षय काही प्रोजेक्ट मध्ये झळकला त्यानंतर तो हिंदी सृष्टीत नशीब आजमावण्यासाठी गेला. तिथे गेल्यावर अक्षयला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली.२०१९ मध्ये तो पुन्हा फोमो या मराठी मालिकेत दिसला होता. पण आता अक्षय पुन्हा मराठीकडे वळलेला पाहायला मिळतो आहे.

akshay mhatre wife shrenu parikh
akshay mhatre wife shrenu parikh

दोन महिन्यांपूर्वी अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री श्रेनू पारीख यांचे लग्न झाले होते. २१ डिसेंबर २०२३ रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत श्रेनूच्या मूळ गावी म्हणजेच वडोदरा येथे त्यांचे लग्न थाटात पार पडले होते. घर एक मंदिर या मालिकेमुळे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रेनू ही अक्षय पेक्षा तीन वर्षाने मोठी असल्याचे सांगितले जाते. पण प्रेमात वय पाहिलं जात नाही असं म्हणतात तेच अक्षयच्या बाबतीत झाले. दरम्यान झी मराठी वाहिनीवर प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अक्षय तेवढाच उत्सुक आहे. त्याच्यासोबत अभिनेता राकेश बापट हा देखील झी मराठीवर पदार्पण करत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून राकेश बापट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान अक्षय म्हात्रे आणि राकेश बापट हे दोन्ही मराठमोळे चेहरे आता झी मराठीचे नायक बनण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे झी मराठी वाहिनीने आता टीआरपी वाढवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button