दाक्षिणात्य सुपरस्टारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन…. लाखो रुपयांची लाच दिल्याचे सर्व पुरावे असल्याने
दाक्षिणात्य सुपरस्टार विशाल याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशालच्या या खुलास्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता विशाल या व्हिडिओत म्हणतो की त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (CBFC) मुंबई कार्यालयात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला आणि या प्रकरणात पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची त्याने विनंती केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात…. विशालने “मार्क अँटनी” या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित करण्यापूर्वी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 6.5 लाखांची लाच दिल्याचा दावा केला आहे. आपल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्याने या व्हिडिओत सांगितले आहे.
मार्क अँटोनीला 15 सप्टेंबर रोजी चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून विशाल म्हणतो की, “आम्ही ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी अर्ज केला पण तांत्रिक अडचणींमुळे ते मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. परंतु त्यानंतर मुंबईतील CBFC कार्यालयात जे घडले ते पाहून आम्ही चक्रावून गेलो. माझ्या जवळच्या व्यक्तीने कार्यालयात भेट दिली, त्यावेळी आम्हाला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 6.5 लाख रुपयांची मागणी केली. एवढी एवढी रक्कम द्या आम्ही तुम्हाला लगेचच प्रमाणपत्र देतो असा पर्याय आम्हाला देण्यात आला. तेव्हा हे पैसे देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.” विशाल पुढे असेही म्हणाला की, “सीबीएफसीमध्ये स्क्रीनिंगसाठी आम्हाला 3 लाख रुपये आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणखी 3.5 लाख रुपये द्यायचे होते.” विशालने संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
“आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता, आम्ही दोन हप्त्यांमध्ये ६.५ लाख रुपये दिले आहेत. जर सरकारी कार्यालयांमध्ये ही परिस्थिती असेल, तर मी उच्च अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो” असे विशाल या व्हिडिओत अधोरेखित करतो. “रुपेरी पडद्यावर दाखवला जात असलेला भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात नाही, तो पचवता येत नाही. विशेषतः सरकारी कार्यालयात. आणि याहून वाईट म्हणजे CBFC मुंबई कार्यालयात घडत आहे. माझ्या कारकिर्दीत कधीही अशा परिस्थितीचा मी सामना केला नाही. आज चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संबंधित मध्यस्थ Menaga ला खूप पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. हे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझ्या माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देत आहे. नरेंद्र मोदीजी. माझ्यासाठी नाही तर भविष्यातील निर्मात्यांसाठी मी हे केले आहे. माझ्या कष्टाचे पैसे भ्रष्टाचारासाठी जातात???. आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल. ” असे म्हणत विशालने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे.