news

धक्कादायक! ड्र ग्ज पार्सल संदर्भात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पैशांची मागणी

सध्या सगळीकडे सायबर क्राईमच्या घटना घडू लागल्या आहेत. आपल्या हलगर्जीपणामुळे किंवा अनावधानाने माहिती दिली जाते तेव्हा अशा घटनांना सामोरे जावे लागते. नुकतेच प्रसिद्ध मराठी मालिका अभिनेत्री सोनाली पाटील हिलाही एक धक्कादायक अनुभव मिळाला आहे. पण वेळीच सतर्क झाल्याने ती या सायबर क्राईमची शिकार झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. सोनाली पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री आहे. देवमाणूस, वैजू नं १ अशा विविध मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये सोनालीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. काल सोनाली पाटीलसोबत एक धक्कादायक घटना घडली. एका अननोन मोबाईल नंबरवरून तिला एक कॉल आला. नार्कोटिक डिपार्टमेंटमधून कस्टम ऑफिसर राजू गुप्ता बोलतोय असे त्याने सोनालीला सांगितले. तुम्ही दिल्लीला एक पार्सल पाठवलंय आणि त्या पार्सलमध्ये अवैध वस्तू सापडल्या असल्याचे त्यांनी सोनालीला म्हटले.

अर्थात या गोष्टीमुळे सोनाली सुरुवातीला खूपच घाबरली होती. त्या ऑफिसरने तिला तिचा आधार नंबरही त्यात नमूद केला असल्याचे सांगितले. तेव्हा मात्र सोनालीला याबद्दल शंका उपस्थित झाली. कारण आपण कुणालाही पार्सल पाठवलेलं नाही आणि जर पाठवलंच असेल तर त्यावर आधार नंबर का देईल? असा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला. सोनालीने पाठवलेल्या पार्सलमध्ये त्या ऑफिसरला ड्रग्ज सापडल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे पार्सल ती कंबोडियाला पाठवणार अशी माहिती आम्हाला मिळाली असे ते तिला सांगू लागले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्या लोकांनी सोनालीकडे पैशांची मागणी केली. सुरुवातीला त्यांचं हे बोलणं ऐकून सोनाली खरंच खूप घाबरली होती. त्याचवेळी जवळ बसलेल्या भावाला तिने हा कॉल स्पीकरवर ऐकवला. सोनालीच्या भावाने त्या ऑफिसरला ओळखपत्र मागितले. पण त्यांनी ते देण्यास नकार दर्शवला.

sonali patil marathi actress
sonali patil marathi actress

त्याचवेळी सोनालीने पोलीस असलेल्या तिच्या मामाला म्हणजेच संजय हरगुडे यांना फोन करून ही माहिती दिली. तेव्हा त्यांनी हा फेक कॉल असल्याचे तिला सांगितले. यानंतर सोनाली निश्चिंत झाली. पण समोरच्या व्यक्तीचे संभाषण पाहून आणि त्यांचा कॉन्फिडन्स पाहून ते किती अभ्यास करून समोरच्याला भुलवतात याची आठवण करून दिली. काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये अशी एक घटना घडली होती. एका प्रतिष्ठित महिलेला असाच एक फोन आला तेव्हा त्या महिलेने १५ लाख रुपये दिले असल्याचे समोर आले होते. पण अशा फोन कॉलला घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला तिने यातून दिला आहे. दरम्यान या घटनेची तक्रार सोनालीने सायबर क्राईमला दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button