वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे..गाण्यातील हि अभिनेत्री आठवते.. वडील देखील होते प्रसिद्ध अभिनेते
असे बरेच मराठी कलाकार आहेत जे आज अभिनय क्षेत्रापासून दुरावले गेले असले तरी त्यांनी केलेलं काम आपल्या नेहमी लक्षात राहत. अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे संज्योत हर्डीकर. ‘वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे…’ हे गाण प्रेक्षकांच्या स्मरणात असेलच. “सावरखेड एक गाव” चित्रपटात अंकुश चौधरी, सोनाली खरे, शर्वरी जेमेनिस, श्रेयस तळपदे, मकरंद अनासपुरे, संज्योत हर्डीकर, सदाशिव अमरापूरकर ही सर्व स्टार कास्ट होती. चित्रपटाच्या हटले कथानकामुळे हे सर्व कलाकार प्रकाशझोतात आले होते. चित्रपटातील अभिनेत्री संज्योत हर्डीकर बदल आज आपण माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
चित्रपटांसोबत अभिनेत्री संज्योत हर्डीकर हिने दामिनी, आभाळमाया या अतिशय गाजलेल्या मालिकेत देखील काम केले होते. इतकंच नाही तर तिने “तरुण तुर्क म्हातारे अर्क” सारख्या काही व्यावसायिक नाटकांत देखील कामे केली आहेत. २० मे २००३ रोजी मिलिंद रहाते सोबत ती विवाहबंधनात अडकली. आता ती अभिनयापासून दूर जात आपल्या संसारात रमलेली पाहायला मिळते. २०१३ साली तिने “लव्ह अँड लाईट” नावाने स्वतःचे पुस्तक देखील लिहिले आहे. हे पुस्तक तिचा खास मित्र अभिनेता श्रेयस तळपदे याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. संज्योत आता आपली दोन मुले आणि पतीसोबत पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात स्थायिक आहे. अभिनेत्री संज्योत हर्डीकर हि अभिनेते जयराम हर्डीकर आणि शंभवी हर्डीकर ह्यांची मुलगी. अभिनेते जयराम हर्डीकर ह्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
जयराम हर्डीकर गिरगावात राहायचे इतके प्रसिद्ध अभिनेते असूनही राहणीमान अगदी साधं असायचं. मध्यम वर्ग कुटुंबातून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नाट्य आणि सिने क्षेत्रात आपलं नाव कमावलं होत. खऱ्या आयुष्यातही ते बेल बॉटम पॅन्ट कॉटन खादीचा शर्ट, कपाळावर सतत ओथंबलेले केस मागे घेत बोलणे आणि हातात सिगारेट चा शोध जणू काही याच्या बोटात शोभण्यासाठी झाला असावा असा देखणा त्यांचा लूक असायचा. अतिशय साधेपणा, नेहमी व्यस्त, आई वडील आणि सर्व कुटुंबीयांसाठी तसेच मित्रांसाठी नेहमी वेळ काढणारा माणूस. पण सिंहासन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जयराम हार्डीकर नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले होते. मुंबईला परतत असताना त्यांच्या नाटकाच्या बसला आग लागून त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं.