
अभिनेता गोविंदा याने त्याच्या नृत्याने आणि सहजसुंदर अभिनयाने करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. पण गेले काही वर्षे इंडस्ट्रीने आपल्याला बाजूला टाकलं अशी खंत तो बोलून दाखवतो. अशातच आता हा गोविंदा मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याची खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. गोविंदा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे जी फक्त ३० वर्षांची आहे. या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याची बातमी अनेक माध्यमांनी समोर आणली आहे. मात्र यामुळे गोविंदा आणि त्याची बायको सुनीता घटस्फोट घेतायत अशी एकच चर्चा सुरू झाली आहे.
गोविंदाच्या अफेअरच्या चर्चेवर हिंदी वृत्त माध्यमांनी शिक्कामोर्तब केला आहे. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त समोर येत असून लवकरच ते वेगळे होतील असेही बोलले जात आहे. दरम्यान ही मराठी अभिनेत्री कोण आहे हे अजूनही समोर आलेले नाही. मात्र ही मराठी अभिनेत्री ३० वर्षांची असून गोविंदा आणी तीच्या वयात ३१ वर्षाचं अंतर असल्याचं सांगितलं जातं. या बातमीमुळे गोविंदा आणि सुनीता यांचा ३७ वर्षांचा संसार मोडकळीस आला असल्याचे म्हटले जाते.

गोविंदा हा अतिशय साधा माणूस आहे. तो कुठल्याही नायिकेसोबत अश्लील वर्तन करताना दिसला नव्हता. आपलं काम भलं आणि आपण भलं या युक्तीने त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवली होती. अभिनेत्री गुड्डी मारुती हिने गोविंदा सेटवर कसा वागत होता याचा खुलासा केला होता. तो कुठल्याही अभिनेत्रीकडे वाईट नजरेने बघत नव्हता. अगदी छोटे छोटे कपडे जरी घातले असले तरी तो त्या दृष्टीने त्यांच्या कडे कधीच बघत नसे. त्यात भर म्हणजे सुनीताचं रोखठोक बोलणं यामुळे गोविंदा तिच्यासमोर नेहमीच दबकून राहायचा. बाहेर कुठलं लफडं करण्यासाठी त्याच्याकडे तेवढा वेळही नव्हता असं सुनीतानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण आता अशा अफेअरच्या चर्चेवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आता गोविंदा स्वतःच या बातमीवर काय उत्तर देतो यावर सगळ्यांच लक्ष लागून आहे.