news

थाटात पार पडला शिवानी सुर्वेचा साखरपुडा… या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ

देवयानी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली शिवानी सुर्वे हिने अभिनेता अजिंक्य ननावरे सोबत मोठया थाटात साखरपुडा केला आहे. नुकतेच शिवानीने तिच्या साखरपुड्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शिवानीने यावेळी गुलाबी रंगाची साडी आणि अजिंक्यने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला होता. फायनली आम्ही साखरपुडा केला असे म्हणत तिने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. शिवानी आणि अजिंक्य २०२४ मध्ये लग्न करणार हे त्यांनी एका मुलाखतीत जाहीर केले होते. त्यामुळे लवकरच त्यांच्या लग्नाचाही थाट पाहायला मिळेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.

shivani surve and ajinkya nanavare wedding engagement
shivani surve and ajinkya nanavare wedding engagement

शिवानी आणि अजिंक्य गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण हे दोघे लग्न कधी करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता. अखेर त्यांच्या लग्नाची घटिका समीप आल्याचे संकेत त्यांनी या साखरपुड्यातून दिले आहे. अजिंक्य सध्या झी मराठीच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर शिवानी नुकताच रिलीज झालेल्या झिम्मा २ या चित्रपटाचा भाग बनली होती. देवयानी या मालिकेनंतर शिवानीला हिंदी मालिका सृष्टीत झळकण्याची संधी मिळाली होती. तू जीवाला गुंतवावे या मालिकेमुळे दोघांची ओळख झाली होती. अजिंक्यची या मालिकेत एन्ट्री झाली त्यानंतर काही दिवसात ही मालिका बंद पडली होती. पण दोघांची पुन्हा भेट घडून आली तेव्हा त्यांच्यात प्रेम जुळत गेले. २०१५ साली हे दोघे एकमेकांना आवडू लागले होते. दोन वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले.

ajinkya nanavare and shivani surve wedding
ajinkya nanavare and shivani surve wedding

तेव्हा हे फक्त अट्रक्शन आहे म्हणत घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. दोघांनी एकत्र राहून दाखवा अशी अट घातल्यानंतर चार वर्षांनी अजिंक्यच्या बाबांनी लग्नाला संमती दिली होती. एका मुलाखतीत शिवानीने याबद्दलचा खुलासा केला होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिवानीला मालिका चित्रपटातून काम कारावे लागले होते. अशा कठीण परिस्थितून तिने तिच्या घराला सावरण्याचे काम केले होते. आता मराठी सृष्टीत स्थिरस्थावर झालेल्या शिवानीने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य देखील मराठी चित्रपटात तसेच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची उत्सुकता सेलिब्रिटी विश्वातही चर्चेचा विषय ठरली होती. तूर्तास शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button