
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करते आहे. एक अभिनेत्री म्हणून तिला यश मिळाले असतानाच लग्नानंतर तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलेले पाहायला मिळाले. साधारण ४ वर्षांपूर्वी शर्मिष्ठाने तेजस देसाई सोबत दुसऱ्यांदा लग्नागाठ बांधली. या दोघांना नुकतीच कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.
आज या दोघांच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी आवर्जून हजेरी लावत शर्मिष्ठाच्या बाळाची नजर उतरवली.

या नामकरण सोहळ्यात शर्मिष्ठाने तिच्या लेकीचं नाव जाहीर केलं. ‘रुंजी’ असे तिने तिच्या या लेकीचे नाव ठेवले असून रुंजी म्हणजे मनाला मोहिनी घालणारं असा अर्थ तिने यावेळी सगळ्यांना सांगितला. या सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याचशा सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शिवानी रांगोळे, कविता मेढेकर, हृषीकेश शेलार ची पत्नी स्नेहा काटे हिनेही या सोहळ्यात हजेरी लावलेली पाहायला मिळाली.