“लोक मला मृणाल ठाकूर सारखी दिसते म्हणतात”…सावळ्याची जणू सावली मालिकेतील बालकलाकार खऱ्या आयुष्यात आहे खूपच सुंदर
एकसारखा चेहरा असणारी जगात ७ व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. बहुतेकदा काहीतरी चेहऱ्यातील साम्यावरून असे अंदाज बांधले जातात. झी मराठी वाहिनीवरील अशीच एक बालकलाकार तिच्या दिसण्यावरून चर्चेत आली आहे. सध्या खान्देशातली मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलिवूड सृष्टी गाजवताना दिसत आहे. नुकतेच मृणालने खान्देशी ठसक्यात एक रील बनवले होते जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मृणाल ठाकूर सारखीच दिसणारी एक बालकलाकार मराठी मालिकांमधून लोकप्रियता मिळवत आहे.
“लोक मला मृणाल ठाकूर सारखी दिसते म्हणतात.” अशा तिला प्रतिक्रिया मिळतात. ही बालकलाकार म्हणजेच सावळ्याची जणू सावली मालिकेतील लहानपणीची सावली होय. सावलीचं खरं नाव आहे दुर्वा देवधर. दुर्वा गेली अनेक वर्षे मराठी मालिका सृष्टीत बालकलाकार म्हणून काम करत आहे. पण तिचा आताचा लूक हा सेम मृणाल ठाकूर सारखाच आहे. बालपणीची मृणाल अशीच असावी असं तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हालाही ते निश्चितच जाणवेल. दुर्वा देवधर ही रंगभूमीशी जोडलेली आहे. यातूनच तिला नवे लक्ष, नवा गडी नवं राज्य, गाथा नवनाथांची, योग योगेश्वर जयशंकर, खुमासदार नात्यांचा गोडा मसाला, सावळ्याची जणू सावली अशा मालिकांमध्ये झळकण्याची संधी मिळाली.
लंडन मिसळ या चित्रपटातही ती झळकलेली आहे. दुर्वाने मृणाल ठाकूरचा एक फोटो आणि तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात दुर्वा सेम मृणाल ठाकूर सारखीच दिसत असल्याने ही बालपणीची मृणाल आहे का असेच सर्वांना वाटेल. भविष्यात कधी या दोघी समोरासमोर आल्याच तर त्यांना एकत्र पाहून लोक नक्कीच आश्चर्यचकित होतील.