news

सारं काही तिच्यासाठी मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री… अभिनेत्रीमुळे मालिकेत येणार नवं वळण

मालिका थोडीशी रंजक वाटावी यासाठी ट्विस्ट आणले जातात. झी मराठीवरील मालिकेत तर आता लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नवरी मिळे हिटलरला, पुन्हा कर्तव्य आहे, सारं काही तिच्यासाठी मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशातच सारं काही तिच्यासाठी मालिकेत एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मालिकेत निशी आणि नीरजचे लवकरच लग्न होणार आहे. निरजला त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी परदेशात जावे लागणार आहे त्यामुळे त्यांचे लवकरात लवकर लग्न कसे होईल याची निरजची आई वाट पाहत आहे. एकीकडे नीरज आणि निशिगंधाचे प्रेमप्रकरण पुढे सरकताना दिसत आहे. मात्र ओवी आणि श्रीनूच्या लग्नात अनेक अडथळे येऊ लागले आहेत.

sara kahi tichysathi actor and actress
sara kahi tichysathi actor and actress

लाली आत्याला श्रीनूसाठी शोभेल अशी मुलगी सून म्हणून हवी आहे. श्रीनुचे लग्न व्हावे म्हणून त्या वेगवेगळी स्थळं शोधू लागल्या आहेत. कारण ओवी सारखी मुलगी आपल्या मुलाला जाळ्यात ओढणार याची त्यांना भीती आहे. त्यामुळे मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे. श्रीनू आणि ओवी एकमेकांना पसंत आहेत हे उमाला ठाऊक आहे पण रघुनाथ रवांना हे कसं सांगायचं? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अशातच आता मालिकेत चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलता गावात येताच काही गुंड तिची छेड काढतात. हे पाहून श्रीनू तिच्या मदतीला धावून जातो. आपल्याला गुंडापासून वाचवणाऱ्या श्रीनूला ती मिठी मारते. तेवढ्यात हा सगळा गोंधळ रोडच्या पलीकडे उभी असलेली ओवी ते पाहते. आता ओवीच्या मनात झालेला हा गैरसमज श्रीनू कसा निस्तरेल हे पुढच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

palvi kadam in serial sara kahi tichyasathi
palvi kadam in serial sara kahi tichyasathi

तर चारुलता नेमकी आहे तरी कोण ? याचाही लवकरच उलगडा होणार आहे. दरम्यान ही भूमिका अभिनेत्री पालवी कदम साकारत आहे. पालवी कदम ही सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री आहे. कंटेंट क्रिएटर, भाडीपा अशा माध्यमातून ती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसते. तिची हीच लोकप्रियता पाहून मराठी चित्रपटांच्या प्रमोशन साठी तिला ऑफर येत असतात. पण आता प्रथमच पालवी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सारं काही तिच्यासाठी ही तिची पहिली मालिका असणार आहे. सोशल मीडिया स्टार ते टीव्ही माध्यमातून अभिनेत्री असा तिचा आता प्रवास सुरु झाला आहे. या नवीन भूमिकेसाठी पालवी कदम हिला खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button