लाडक्या लेकीची २ री मालिका पण गम्मत वाटते कि तिला अशी … संदीप खरेंनी लेकीबद्दल लिहलेली पोस्ट चर्चेत
तू तेव्हा तशी या मालिकेत रुमानी खरे हिने राधाची भूमिका साकारत होती. राधाचा बिनधास्तपणा रुमानीचे तिच्या सहजसुंदर अभिनयाने चांगला वठवला होता. त्याचमुळे तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावलेली दिसली. शाळेत असल्यापासूनच रुमानी नाटक, चित्रपटातून काम करत होती. चिंटू आणि चिंटू २ या चित्रपटांमध्ये रुमानी बालकलाकार म्हणून झळकली. अभिनयासोबतच रुमानीला नृत्याची विशेष आवड आहे. रुमानीने कथ्थकचे प्रशिक्षण घेतलं आहे. २०१९ साली ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
रुमानी खरे हीने अभिनव विद्यालय तसेच एस पी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मधल्या काळात बालभारतीने एक डॉक्युड्रामा साकारला होता; त्यात रुमानीला देखील झळकण्याची संधी मिळाली होती. बालभारतीचा प्रेरक इतिहास आणि संस्थेने आजवर केलेली प्रगती नव्या पिढीला समजावी म्हणून हा डॉक्युड्रामा बनवण्यात आला होता. कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. रुमानी खरे हि प्रसिद्ध गायक संदीप खरे यांची एकुलती एक मुलगी. आता रुमानी हिची दुसरी मालिका दुर्गा कलर्स मराठीवर येत्या २६ ऑगस्ट पाहून सुरु होणार आहे.
मुलीबद्दल नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहली आहे त्यात ते म्हणतात “लाडक्या लेकीची दुसरी serial…. प्रमुख भूमिका असलेली…. अगदी तिच्या भूमिकेचंच नाव मालिकेला दिलेलं…. ‘कसं वाटतंय ‘ हा अत्यंत nonsense प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो…. मला आत्ता कोणी विचारला तर मला odd नाही वाटणार पण खरं सांगू… शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार ! अगदी परवा पर्यंत तर एवढीशी होती आणि आता मारे shooting, प्रवास, उलट सुलट schedules सगळं सांभाळत आम्हालाच सांगत असते की ‘ chill, बाबा!” आणि मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल पण करते ! आम्ही आई बाबा… लेकीचं कौतुक वाटणारच…. पण तिच्या पहिल्या ‘ तू तेव्हा तशी ‘ या मालिकेपासून आत्ताच्या या प्रोमो पर्यंत साऱ्यांचंच उदंड प्रेम, आशीर्वाद तिला लाभतायत ! या दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद, कौतुक तिला लाभेल असा विश्वास आहे ! एक गंम्मत मात्र वाटते….तिच्या शांत, शहाण्या, समंजस स्वभावाला ‘ दुर्गा ‘ नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारच मजेशीर आहे ! मालिका जरूर पहा… तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत !”