सैराट चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला तानाजी गळगुंडे हा गेले काही वर्ष गर्लफ्रेंड सोबत लिव्हइन मध्ये राहतोय असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. पण त्या गर्लफ्रेंडचे नाव जाहीर करणे त्याने टाळले होते. पण आता तानाजीने नुकताच यावर खुलासा केलेला पाहायला मिळाला आहे. सैराट चित्रपटानंतर तानाजी अनेक चित्रपटात झळकला. या क्षेत्रात यश मिळत असताना त्याने गावच्या शेतीतही सुधारणा केली. शिवाय पायाच्या तळाव्यात गॅप असल्याने त्याला ऑपरेशन करणे भाग होते. जवळपास १० ऑपरेशन नंतर तानाजी आता व्यवस्थित चालू लागला आहे. कामानिमित्त गेले काही वर्ष तो पुण्यात राहतो आहे. एका मुलाखतीत तानाजी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोलला होता.
पण ती वेगळ्या कास्टची असल्याने आईला ते मान्य नव्हतं असे तो म्हणाला होता.” माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कास्टची आहे. आम्ही गेली ५-६ वर्षे एकमेकांसोबत आहोत. आम्ही अनेकदा एकत्र भेटतो, बोलतो. माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेच माझी खूप काळजी घेतली होती. पण आईला जेव्हा हे कळलं की आम्ही दोघ लिव्हइन मध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत भांडण केलं. तिला ते बिलकुल मान्य नव्हतं. ती मुलगी दुसऱ्या कास्टची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्या गावातली आहे. त्या मुलीसोबत एकत्र राहायचं तिच्याशी लग्न करायचं नाही असं माझी आई मला म्हणाली. तू दुसरी कोणीही कर अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची कर पण तिला करू नको, कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं. ती वेगळ्या जातीची आहे हे गावातल्या लोकांना समजू नये म्हणून ती असं म्हणत होती.
मला तिचं ते म्हणणं पटत नव्हतं.” असे तानाजी म्हणाला होता. पण आता नुकतेच त्याच्या या गर्लफ्रेंडचे नाव त्याने जाहीर केले आहे. प्रतीक्षा शेट्टी असे तानाजीच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. गेल्या ५-६ वर्षांपासून ते दोघे प्रेमात आहेत. नवीन वर्षाची सुरुवात त्याने गर्लफ्रेंडचे नाव रिव्हील करून केली आहे. प्रतीक्षा ही मॉडेल आहे. “Soap sparsh” या नावाने हॅन्ड मेड साबण बनवण्याचा तिचा व्यवसाय आहे. लवकरच तानाजी आणि प्रतीक्षा लग्नबांधनात अडकताना पाहायला मिळोत अशीच एक अपेक्षा त्याच्या या बातमीवर दिली जात आहे.