अप्पी आमची कलेक्टर मालिकेत सिंबाच्या रिअल बाबाची एन्ट्री.. पहिल्यांदाच बाप लेकाने केली स्क्रीन शेअर
सध्या झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र यावेत यासाठी सिंबा प्रयत्न करत आहे. तर किडनॅपिंग मुळे साइराज प्रथमच अर्जुनला बाबा म्हणून हाक मारताना दिसला आहे. या घटनेने अर्जुनच्या मनात अप्पीबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. सिंबावर तिने योग्य संस्कार केलेत असे म्हणत तो त्याच्या वडिलांजवळ अप्पीचं कौतुक करत आहे. सिंबा किडनॅप झाल्यानेच मालिकेला हे निर्णायक वळण मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे मालिकेत सिंबाच्या रिअल बाबांची देखील एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे.
सिंबा म्हणजेच साइराज केंद्रे ह्याचे वडील गणेश केंद्रे यांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केलेली आहे. तसेच मुलगा साइराज सोबत त्यांना प्रथमच स्क्रीन शेअर करता आली आहे. साइराजच्या वडिलांना बहुतेक प्रेक्षकांनी ओळखले असेलच कारण साइराज सोबत ते अनेकदा रील बनवताना दिसत होते. त्यामुळे गणेश केंद्रे यांनाही कलेची आवड आहे हे यातून लक्षात येते. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत साइराज केंद्रे म्हणजेच सिंबाला किडनॅप करण्यात आलेल्या किडनॅपरच्या भूमिकेत गणेश केंद्रे झळकले होते. ही अगदी छोटीशी भूमिका असली तरी गणेश केंद्रे यांनी त्यांच्या अभिनयाने ही भूमिका सुंदर वठवलेली पाहायला मिळाली. किडनॅपर आणि सिंबाचे एकत्रित सीनदेखील या मालिकेत पाहायला मिळाले होते.
आता अर्जुनने सिंबाला या कीडनॅपरच्या तावडीतून त्याला सोडवलेलं आहे. त्यामुळे गणेश केंद्रे यांनी साकारलेल्या पात्राची एक्झिट करावी लागली आहे. पण या छोट्याशा भूमिकेने गणेश केंद्रे यांना मराठी मालिका सृष्टीत आणण्याचा मार्ग मोकळा केला आहे. साइराज आणि गणेश केंद्रे या दोघा बाप लेकाला रिल्स बनवण्याची आवड आहे. गणेश केंद्रे हे साइराजमुळे प्रकाशझोतात आलेले पाहायला मिळाले. याचाच परिणाम असा झाला की या दोघांनाही मालिका सृष्टीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.