news

सई ताम्हणकरने पाडव्याच्या मुहूर्तावर घेतली मर्सिडीझ कार… महागड्या घरानंतर आता घेतली महागडी कार पहा किती आहे किंमत

सईने मुंबईत स्वतःच्या हक्काचा फ्लॅट खरेदी केला आहे. आपला फ्लॅट आलिशान नसला तरी या घरात मन माझं रमतं असे ती सांगते. खिडकीत बसून सकाळच्या कॉफीचा आस्वाद घेत दिवसाची ती सुरुवात करते. सकाळचा हा एक तास मी स्वतःसाठी काढते त्यामुळे कामाची सुरूवात चांगली होते असे ती सांगते. सई आपल्या या नवीन घराबद्दल सांगते की, “या घरात किती लोक मावतील हे मी नाही सांगू शकत कारण या घरात ३० ,४० माणसं येऊन राहिली आहेत. ती सेटल झाली आहेत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या हातात सर्व गोष्टी याव्यात असं वाटतं पण मी सध्या या घरात एकटीच राहते त्यामुळे स्वतःसाठी नाश्ता आणि जेवण बनवणं या गोष्टी मलाच कराव्या लागतात.”

sai tamhankar buy Mercedes benzgal car
sai tamhankar buy Mercedes benzgal car

सईचं मुंबईतील हे घर एकदम प्रशस्त आहे, पांढऱ्या रंगाच्या थीमला तिने विशेष प्राधान्य दिलेले पाहायला मिळते त्यामुळे भरपूर उजेड आणि प्रसन्न वाटावं असं या घराचं इंटेरिअर तिने करून घेतलं आहे. सई ताम्हणकर ही गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून सई बॉलिवूड इंडस्ट्रीतही स्वतःच्या नावाचा ठसा उमटवत आहे. एवढ्या वर्षात तिने हक्काचं घर खरेदी केलं नव्हतं पण ह्यावर्षी तिने स्वतःच घर घेतलं. सईला आलिशान गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर काहीच वर्षात सई पुन्हा नवीन ब्रँडची गाडी खरेदी करत असते. काल गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने मर्सिडीझ बेंझ ची बेन्झगल हि तब्बर १.१६ कोटींची कार खरेदी केली आहे. पांढऱ्या रंगाच्या ह्या कारचा एक व्हिडिओ देखील तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

ती म्हणते “स्वप्नील जोशी नेहमी मी घेतलेल्या महागड्या कारवार आपली प्रतिक्रिया देत असतो मुळात तो देखील महागड्या गाड्यांचा फॅन आहे. तो मला काहीही बोलला तरी मी हसते आणि मला जी कार घायची तीच घेत असते.” साई सध्या मराठीतील टॉपची हिरोईन म्हणून ओळखली जातेच त्याच बरोबर आता हिंदी सिनेमांत आणि ओटीत प्लॅटफॉर्मवर देखील जोरात काम करताना पाहायला मिळते. असो अभिनेत्री सई ताम्हाणकरला तिच्या नव्या कोऱ्या महागड्या कारसाठी खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button