news

घर वाले मान गये म्हणत … कन्यादान मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच झाला साखरपुडा

सध्या मराठी इंडस्ट्रीत लग्नसोहळ्याला उधाण आलेले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल तीन कलाकारांनी साखरपुडा करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तर नुकतेच सन मराठी वाहिनीवरील प्रसिध्द अभिनेता चेतन गुरव यानेही साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे. ‘घर वाले मान गये’ असे म्हणत चेतनने गर्लफ्रेंड सोबतचा एक फोटो शेअर केला होता. पण पाठमोरी उभी असल्याने त्याच्या चाहत्यांनी तिचे नाव रिव्हील करण्याची मागणी केली होती. पण आता चेतनच्या साखरपुड्याचीच बातमी समोर आल्याने त्याची गर्लफ्रेंड कोण आहे याचा आता खुलासा झाला आहे. सन मराठीवरील कन्यादान मालिकेतून आकाशच्या भूमिकेने चेतनला लोकप्रियता मिळाली आहे.

payal harmalkar and chetan gurav wedding engagement photos
payal harmalkar and chetan gurav wedding engagement photos

पायल हरमलकर हिच्याशी चेतन गुरव याने साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याला मंदार भुरके, रोहित माने या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, अमित खेडेकर, समीर खांडकेकर यांनी चेतन आणि पायलच्या साखरपुड्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कॉलेजमध्ये असतानाच चेतनने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. माधुरी मिडल क्लास या स्टार प्रवाहच्या मालिकेतून त्याने एक मजेशीर भूमिका साकारली होती. वैजू नं १ आणि त्यानंतर तो आता सन मराठीच्या कन्यादान मालिकेतून झळकतो आहे. आकाश आणि अमृताच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं आहे. त्याचमुळे ही मालिका दोन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

chetan gurav and payal harmalkar wedding engagement
chetan gurav and payal harmalkar wedding engagement

चेतनने ही भूमिका सुंदर वठवली आहे. साखरपुड्याच्या अगोदर चेतनने त्याच्या रिअललाईफ गर्लफ्रेंडचा एक पाठमोरा फोटो रिव्हील केला होता. त्यामुळे त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. पायल हरमलकर हिला नृत्याची आवड असून साखरपुड्यानंतर चेतन लवकरच तिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी पायल आणि चेतन गुरव यांना मनापासून शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button