झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अक्षराची बहीण इरा म्हणजेच अभिनेत्री रुता काळे हिला खऱ्या आयुष्यात तिच्या बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने प्रपोज केलेले आहे. रुता काळे हिचा बॉयफ्रेंड अभिषेक लोकनर हा मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे. अभिषेक गुडघ्यावर बसून रुताला प्रपोज करत आहे. हे खास फोटो दोघांनीही त्यांच्या इन्स्टग्रामवर शेअर केलेले आहेत. ते पाहून मराठी सृष्टीतील तमाम सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एका फोटोत रुताने तिच्या बोटातली अंगठी दाखवत अभिषेकचे प्रपोजल स्वीकारल्याचे सांगितले आहे. “आता आणि कायमस्वरूपी ” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
रुताचे सहकलाकार ऋषीकेश शेलार, रुपलक्ष्मी तसेच समीर परांजपे, ऐश्वर्या डोरले या सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन करणारे मेसेजेस केले आहेत. तुला शिकवीन चांगलाच धंदा मालिकेमुळे रुता काळे प्रकाशझोतात आली.रुता ही रंगभूमीवरची कलाकार. पंधरवडा, अनवट या चित्रपटात तिने काम केले होते. याच चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक लोकनर सोबत तिचे सूर जुळून आले. या चित्रपटात काम केल्यानंतर दोघांची ओळख झाली. मैत्री आणि नंतर या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. आज या दोघांनी त्यांचे हे नाते सोशल मीडियावर जाहीर केलेले पाहायला मिळत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत रुताने सुरुवातीला सहाय्यक भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. बहीण अक्षराचे तिने अधिपतीशी फसवून लग्न लावले आहे.
त्यामुळे सध्या रुता विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. रुताच्या याच विरोधी भूमिकेचा प्रेक्षकांना राग येतो ही तिच्या सजग अभिनयाची पावतीच म्हणावी लागेल. रुताने गोठ या लोकप्रिय मालिकेत बकुळाची भूमिका साकारली होती. छोट्या छोट्या भूमिकेतून पुढे आल्यानंतर तिला अनवट सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.