नवऱ्याच्या आठवणीत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी झाल्या भावुक…अभिनेते तसेच नाट्यदिग्दर्शक अशी होती ओळख
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाहीत. क्वचित प्रसंगी आपल्या नवीन प्रोजेक्ट निमित्त त्या पोस्ट करताना दिसतात. पण आज नवऱ्याच्या आठवणीत त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. ५ डिसेंबर रोजी जयदेव हट्टंगडी यांचा स्मृतिदिन असतो. १९७७ साली त्या दोघांनी लग्नगाठ बांधली होती..२००८ साली जयदेव हट्टंगडी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे निश्चितच ३१ वर्षांच्या एकत्रित सहवासाच्या आठवणीने त्या भावुक झाल्या आहेत.
जयदेव हट्टंगडी हे अभिनेते, नाट्यदिग्दर्शक तसेच नाट्य परीक्षक होते. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून या दोघांनी अभिनयाचे धडे गिरवले होते. चांगुणा, भिंत, गौराई, पोस्टर अशी नाटकं त्यांनी गाजवली होती. त्यांनी स्वतः कलाश्रय नावाने नाट्यसंस्था सुरू केली. यातूनच त्यांनी काही नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने त्यांचे निधन झाले.
असीम हा त्यांचा मुलगा तर अवनी देशपांडे ही त्यांची सून दोघेही मराठी, हिंदी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यात विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांचे मराठीत एकामागून एक चित्रपट रिलीज होत आहेत त्यामुळे निश्चितच या प्रवासात ते जयदेव हट्टंगडी यांना मिस करत आहेत.