मराठी कलाकारांना त्यांच्या कामातून आता चांगले पैसे मिळू लागले आहेत. सुरुवातीच्या काळात पैसे चांगले मिळत नाही अशी ओरड पाहायला मिळायची. पण आता या इंडस्ट्रीत काम करताना अनेकांची गाडी आणि घर घेण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत. अशातच महागडी गाडी खरेदी करण्यावरूनही एक स्पर्धा इथे पाहायला मिळते. मराठी सृष्टीतील कलाकार करोडो किंमतीच्या गाड्या खरेदी करत आहेत. सई ताम्हणकर हिच्याकडे तर अशा कित्येक गाड्या आहेत. तिला सतत नवनवीन गाड्या खरेदी करण्याची हौस आहे. स्वतः स्वप्नील जोशीही तिला याबद्दल चिडवत असतो.
पण आता स्वतः स्वप्नील जोशीनेच कोट्यवधी किंमतीची गाडी खरेदी करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतीच स्वप्नील जोशीने Land Rover Range Rover Defender ही तब्बल १.५७ कोटी किंमतीची गाडी खरेदी केली आहे. ही महागडी गाडी खरेदी करण्यासाठी स्वप्नीलला त्याच्या बाबांनी प्रोत्साहन दिले, याचे श्रेय तो बाबांनाच देताना दिसतो. काहीच वर्षांपूर्वी स्वप्नीलने Jaguar I Pace ही तब्बल १.१२ कोटीची महागडी गाडी खरेदी केली होती. त्यावेळीही महागडी गाडी खरेदी करण्याचे श्रेय तो त्याच्या बाबांनाच देताना दिसला होता.
मराठी सृष्टीतील एक मोठा नट आहेस तू महागडी गाडी खरेदी करू शकतोस असा विश्वास त्यांनी त्याला दिला होता. त्याचं हे पाठबळ असल्याने स्वप्नील जोशी हे धाडस करू शकला आहे. यानिमित्ताने मराठी सेलिब्रिटींनीही स्वप्नील जोशीचे अभिनंदन केले आहे. जवळपास दीड कोटींहून अधिक किंमतीची गाडी खरेदी करणारा स्वप्नील जोशी हा पहिला मराठी कलाकार ठरल्याने त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.