या मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची लगबग सुरू… कलाकारांनी एकत्र मिळून रेश्मा शिंदेचं केळवण केलं साजरं
गेल्या काही दिवसांत कलाकारांच्या लगीनघाईला सुरुवात झालेली आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता निखिल राजेशिर्के याने चैत्राली मोरे सोबत अरेंज मॅरेज केले. त्याच्या पाठोपाठ आता त्याची खास मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे देखील बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच रेश्मा शिंदे हिचे केळवण साजरे करण्यात आले. रंग माझा वेगळा या मालिकेत रेश्माने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेच्या कलाकारांनी एकत्र मिळून रेश्मा शिंदेचं केळवण साजरं केलं आहे. ‘रेश्माचं केळवण’ असे कॅप्शन देऊन तिच्या लग्नाची लगबग सुरू झाल्याचे या सर्वांनी म्हटले आहे.
यावेळी हर्षदा खानविलकर, विदिशा म्हसकर, शाल्मली तोळे, अनघा भगरे, आशुतोष गोखले, अनुष्का पिम्पुटकर, अंबर गणपुले यांनी खास हजेरी लावली होती. ब्राईड टू बी म्हणत रेश्माने तिच्या दुसऱ्या लग्नाची बातमी जाहीर केलेली आहे. रेश्मा शिंदे हिने महाराष्ट्राची सुपरस्टार मधून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. बंध रेशमाचे, लगोरी, नांदा सौख्य भरे, चाहूल रंग माझा वेगळा आणि आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून ती लोकप्रियता मिळवत आहे. २०१२ मध्ये रेश्माने अभिजित चौगुले सोबत पहिले लग्न केले होते. पण ५ वर्षातच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१७ साली तिने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. या दरम्यान ती अभिनेता अक्षर कोठारीसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याच्या बातम्या पसरू लागल्या.
हे दोघेही अनेकदा एकत्रीत पाहायला मिळाल्याने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे बोलले जाऊ लागले. पण या बातमीत पुढे काही तथ्य नसल्याचे दिसून आले. मात्र आता रेश्मा शिंदे हिच्या लगीनघाईमुळे ती कोणासोबत लग्न करतेय हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे रेश्माचा हा होणारा नवरा आहे तरी कोण? याबद्दल एकच चर्चा पाहायला मिळत आहे.