
अभिनेता सागर कारंडे हा आता नाटक, मालिकेत दिसत नाही. काही दिवसांपूर्वी तो एका चित्रपटात पाहायला मिळाला होता. मात्र आता सोशल मीडियावर जाहिरात करून सागर कारंडेने स्वतःचीच फसगत करून घेतली आहे. ” इन्स्टाग्रामची पोस्ट लाईक करा आणि घरबसल्या १५० रुपये कमवा” अशी एक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर पाहिली होती. यानंतर सायबर गुन्हेगारांनी सागरला तब्बल ६१ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे आता उघड झाले आहे. नुकताच सागर कारंडे याने यासंदर्भात सायबर क्राईम पोलीसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखि व्हाट्सअपवरून एका महिलेने सागरशी संपर्क साधला होता. टेलिग्रामवरून आणि इन्स्टग्राम लिंकला लाईक करा म्हणून तिने सागरला आवाहन केलं होतं.

प्रत्येक लाईकला १५० रुपये असे दिवसाला एकूण ६००० रुपये मिळतील असे तिने सागरला सांगितले होते. पण या ६ हजाराच्या अमिषापोटी सागरने स्वतःचीच फसवणूक करून घेतली. इन्स्टाग्रामवरील लिंकला लाईक करत असताना सागरच्या बँकेच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६१ लाख ८३ हजार रुपये लंपास केले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सागर कारंडे याने पोलिसांकडे धाव घेतली आहे. सागर कारंडे बद्दल सांगायचं झालं तो तो इंजिनिअर आहे. नोकरी करत असतानाच तो अभिनय क्षेत्राकडे वळला होता. मात्र नोकरीत मन रमेना म्हणून त्याने पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राला झोकून दिले. चला हवा येऊ द्या मधील त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करण्यात आले.

मात्र सह कलाकारांसोबत काहीतरी बिनसलं आणि त्याने चला हवा येऊ द्या मधून काढता पाय घेतला. साधारण दीड दोन वर्षांपूर्वी नाटकाच्या दौऱ्यात असताना त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला त्रास जाणवू लागल्याने चालू नाटक त्याने थांबवले होते. गेल्या वर्षी एका चित्रपटात पाहिल्यानंतर तो अभिनय क्षेत्रापासून दुरावलेलाच दिसला. तर काहीच दिवसांपूर्वी स्त्री पात्र साकारणार नाही अशी इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. त्यानंतर आता या फसवणुकीच्या बातमीने सागरवर आणखी एक मोठं संकट येऊन कोसळलेलं पाहायला मिळत आहे.