news

सैराट चित्रपटाचा पार्ट २ कधी येणार म्हणता म्हणता ‘धडक’ २ चा टीझर आला समोर…ही फ्रेश जोडी आणि उत्कंठावर्धक कथानक

सैराट चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर बॉलिवूड टॉलीवूडलाही वेड लावलं होतं. आरची आणि परशा महाराष्ट्रात हिट झाले आणि या चित्रपटा रिमेक बनवण्यात आले. दक्षिणेत बनलेल्या रिमेकमध्ये रिंकू राजगुरू हिला पुन्हा एकदा कास्ट करण्यात आले. पण बॉलिवूडमध्ये ईशान खत्तर आणि जान्हवी कपूरची फ्रेश जोडी पाहायला मिळाली. अर्थात या धडक चित्रपटाने फारशी कमाल घडवून आणली नाही कारण मराठी सैराटचा प्रेक्षकांच्या मनावर तेवढा पगडा पाहायला मिळाला होता. तसेच सैराट मधील गाण्याने सगळ्यांना थिरकायला भाग पाडले होते. अर्थात सैराट नंतर चित्रपटाचा पार्ट२ कधी येणार अशी विचारणा कित्येकदा होऊ लागली.

नागराज मंजुळे यांनाही अनेकदा याबद्दल विचारण्यात आले होते. मात्र सैराट २ येणार नसल्याचे त्यांनी अशाच एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. पण अर्धवट राहिलेल्या या सैराटची कथा आता’ धडक २’ मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आरची आणि परशाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचं काय होतं हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला धडक २ मध्ये उलगडणार आहे. येत्या २२ नोव्हेंबर २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये एनिमल चित्रपट अभिनेत्री तृप्ती डीमरी प्रमुख भूमिका साकारत आहे. तर सिद्धांत चतुर्वेदी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्स प्रस्तुत धडक २ चित्रपटाचे दिग्दर्शन शाझिया इकबाल यांनी केले आहे. तर करण जोहर सह आणखी काही निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी साहाय्य केले आहे..त्यामुळे सैराट चा पार्ट २ जरी बनत नसला तरी धडक २ च्या माध्यमातून ही कहाणी पूर्ण होईल का अशी आशा निर्माण झाली आहे. धडक २ या चित्रपटातही तुम्हाला जातीयवाद पाहायला मिळणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे हा चित्रपट किमान सैराटवर प्रेम असलेल्या प्रेक्षकांची निराशा करणार नाही एवढीच एक अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button