धक्कादायक! या कारणामुळे तेजश्री प्रधानने सोडली प्रेमाची गोष्ट मालिका…ही अभिनेत्री साकारणार मुक्ताची भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका एका रंजक ट्रॅकवर आली आहे. नुकतेच सावनीने तिच्या चुकांची कबुली दिल्याने तिला घराबाहेर पडावं लागलं आहे. पण आता हा इंटरेस्टिंग ट्रॅक सुरू असतानाच मालिकेची मुख्य नायिका म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिका सोडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधान यांनी सागर मुक्ताच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मुक्ताच्या भूमिकेने तेजश्रीला आणखी एक प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
होणार सून मी ह्या घरची मालिकेने तेजश्रीला छोट्या पडद्यावर ओळखले जाऊ लागले होते. प्रेमाची गोष्ट या तिच्या मालिकेवरही प्रेक्षक प्रतिसाद देताना दिसले. (तेजश्री तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, “कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं… तुमचं महत्व आणि तुमच्या असण्याचा आदर करायला शिका कारण दुसरं कोणीही हे तुमच्यासाठी करणार नाही…” असे म्हणत तेजश्रीने ‘तुमच्या पात्रतेपेक्षा स्वतःला कमी लेखू नका’ असे म्हटले आहे. देवाने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगले योजून ठेवले असेल असे ती या पोस्टमध्ये म्हणताना दिसत आहे. त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडण्याचे हे तर कारण नाही ना अशी चर्चा पाहायला मिळत आहे. ) त्यामुळे मुक्ताची भूमिका तेवढ्याच सशक्त अभिनेत्रीला देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता इथून पुढे ही भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार असल्याचे समोर आले आहे. स्वरदा ठिगळे हिने अनेक मराठी मालिकांसह हिंडी मालिकेतही काम केलं आहे. गेल्या वर्षी सिद्धार्थ राऊत सोबत तिने लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती कुठल्या मालिकेत दिसली नाही. पण आता स्वरदाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याची संधी मिळाली आहे.
स्वराज सौदामिनी ताराराणी मालिकेनंतर ती पुन्हा मुख्य भूमिका साकारत आहे. पण यावेळी तेजश्रीने ही भूमिका साकारल्याने प्रेक्षक तिला लवकर स्वीकारणे अवघड जाणार आहे. त्यामुळे हे एक मोठं आव्हान तिच्यासाठी असणार आहे. दरम्यान प्रेमाची गोष्ट या मालिकेत अगोदरच २ कलाकारांची रिप्लेसमेंट करण्यात आली होती. मुक्ताच्या बहिणीची त्यानंतर हर्षवर्धनची आणि आता मुक्ताचीच रिप्लेसमेंट झाल्याने या मालिकेबद्दल प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिका सोडल्याचे कारण अद्याप दिलेले नाही, पण तदेव लग्नम या चित्रपटामुळे ती मालिकेत काम करत नसल्याचे बोलले जात आहे.