मराठी मनोरंजन विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री कौमुदी वालोकर हिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे तर आज गुरुवारी ५ डिसेंबर रोजी मराठी मालिका अभिनेता प्रतीक पाटील याचा थाटात लग्नसोहळा पार पडला आहे. निकिता पाटील हिच्याशी प्रतीक विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाला हार्दिक जोशीने खास हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मध्यप्रदेशातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बुऱ्हाणपूर शहरात हा लग्नसोहळा पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून प्रतीक आणि निकीताच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती.
मेंदी, हळद ,संगीत सोहळा आणि आज त्यांचा लग्नसोहळा पार पडला. काल त्यांच्या संगीत सोहळ्याला हार्दिकने आवर्जून हजेरी लावली होती तर आजही तो या लग्नाला उपस्थित राहिला होता. प्रतिक पाटीलने झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून सुहासची भूमिका साकारली होती. हार्दिक जोशी सोबत काम करताना त्यांची खूप छान मैत्री जुळून आली होती. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नात प्रतीक आवर्जून उपस्थित राहिला होता.
मालिकेनंतरही त्यांनी त्यांचं भावासारखं नातं जपून ठेवलं आहे. प्रतीक पाटील याला अभिनयाची आवड आहे. मालिका, चित्रपटातून काम करता यावे यासाठी तो मोठी मेहनत घेताना दिसतो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत तो सकारात्मक भूमिका साकारताना दिसला होता. प्रतीक पाटील आणि निकिता पाटील यांचे नुकत्याच पार पडलेल्या लग्न सोहळ्यानिमित्त त्यांचे अभिनंदन!.