news

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मुलाने प्रसाद ओकला दिलं अतिशय महागडं गिफ्ट… गाडीची किम्मत ऐकून व्हाल अवाक

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याला त्याच्या मुलाने एक खास सरप्राईज दिलं आहे. आज ३ सप्टेंबर प्रसाद ओकचा मुलगा सार्थक याचा आज वाढदिवस आहे पण सार्थकने त्याच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबांसाठी महागडी कार गिफ्ट केली आहे. BMW X5 ही तब्बल १ कोटी ११ लाख किंमतीची महागडी गाडी खरेदी करून सार्थकने अवघ्या २४ व्या वर्षी प्रसादला सरप्राईज दिलं आहे. अर्थात हे सरप्राईज प्रसाद साठी आश्चर्याचं होतंच पण आता प्रेक्षकांनाही याचं मोठं कुतूहल वाटत आहे. या महागड्या गिफ्ट बद्दल प्रसादची पत्नी मंजिरीने एक खास पोस्ट लिहिताना म्हटले आहे की, “सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची.. तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ).

prasad oak family photo
prasad oak family photo

तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्यानी तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना 🤪) त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस…

sarthak prasad oak
sarthak prasad oak

मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ). माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंक चा पण…!!! खूप मोठ्ठा हो स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा B”est “M”any “W”ishes”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button