
काही दिवसांपूर्वी लंडन स्थित अभिनेत्री राधिका आपटे हिने सिस्टर मिडनाईट या चित्रपटाच्या प्रीमिअर सोहळ्यात बेबी बम्प फ्लॉन्ट केला होता. राधिका आपटे लग्नानंतर तब्बल १२ वर्षाने आई होणार ही बातमी कळताच मराठीसह हिंदी सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले होते. राधिका आपटे पाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे नेहा गद्रे. नेहा गद्रे हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मालिका सृष्टीचा एक काळ गाजवलेला पाहायला मिळाला.
मन उधाण वाऱ्याचे, गडबड झाली, मोकळा श्वास अशा चित्रपट मालिकेतून नेहाने प्रसिद्धी मिळवली आज. नेहा गद्रे सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. ईशान बापट सोबत लग्न झाल्यानंतर तिने आपल्या घरसंसाराकडे लक्ष केंद्रित केले होते. साधारण दोन वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियात राहून शिक्षिकेची पदवी मिळवली होती. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली नेहा आता लवकरच आई होणार आहे. नुकतेच नेहा आणि ईशानने ऑस्ट्रेलियातील टंगलूमा बीचवर फोटोशूट केलं आहे. तिच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे.

“Our greatest adventure is about to begin” असे म्हणत तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर सांगितली आहे. नेहा गद्रे ही मूळची पुण्याची. काहीच दिवसांपूर्वी ती पुण्याला तिच्या आईवडिलांना भेटायला आली होती. यावेळी नेहाने तिच्या मित्र मैत्रिणींची खास भेट घेतली होती. ५ वर्षांपूर्वी नेहाने अश्विनसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियातच स्थायिक झालेली पाहायला मिळाली. अभिनय क्षेत्र सोडून ती तिची फॅमिली लाईफ एन्जॉय करत होती. गडबड झाली हा तिने अभिनित केलेला शेवटचा चित्रपट ठरला होता.
