“आयुष्यात पहिल्यांदा ट्रोल होतोय”…. माझ्याकडे पाहून हार्दीकने ट्रॉफी उंचावली म्हणणाऱ्या प्रसाद खांडेकरचं ट्रोलिंगवर उत्तर
‘आयुष्यात पहिल्यांदाच ट्रोल होतोय’ म्हणत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर याने कालच्या त्याच्या पोस्टचे स्पष्टीकरण दिले आहे. काल मुंबईच्या रस्त्यावर विश्वविजेत्या चॅम्पियन्सचे स्वागत करण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. या गर्दीत हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर उपस्थित होता. या खेळाडूंना समोर पाहून प्रसादला खूप आनंद झाला होता. हा आनंद त्याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. पण यावरून आपल्याला ट्रोल केलं जाईल याचा त्याने विचारसुद्धा केला नव्हता. या ट्रोलिंगवर प्रसाद म्हणतो की,”भावांणो आणि बहिणींनो आयुष्यात पहिल्यांदाच ट्रोल झालोय म्हणून गंमत म्हणून कमेंट करतोय..
कदाचित तुम्ही माझी पूर्ण पोस्ट वाचली नसेल …मला हार्दिक ने ओळखलं अस मी कुठेच म्हटलं नाहीये … टेलिपथी नावाची एक गोष्ट असते त्याबद्दल बोललोय … हार्दिक ने काल जस शंभर करोड लोकांकडे बघून कप उंचावला त्यातला मी एक होतो .. तुमच्या सारखाच भारताचा अभिमान असणारा आणि इंडीयन क्रिकेट टीम चा फॅन
भारत जिंकलाय आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे हे सांगायचं होत …. पण वेगळा अर्थ काढला गेला असो … तुम्हा सगळ्यांना आपल्या ह्या विजयाच्या प्रचंड शुभेच्छा”
खेळाडूंना समोर पाहून भारावलेल्या प्रसादने काल केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “आज साऊथ मुंबई ला कामानिमित्त जायचंच होत विचार केला की नरिमन पॉईंट ला जाऊन चॅम्पियन्स च्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया … पण न्यूज मधली गर्दी चे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला गप्प पणे बोरिवलीला निघालो … साधारण सांताक्रूझ च्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथून च जाणार आहेत नन्तर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडिया ची वाट बघत होते …. क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाड़ीतून समोर आले.
अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला … कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथी ने हार्दिक पांड्या पर्यंत पोहोचला असावा त्याने सुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्ड कप चा कप उंचावला .. आयपीएल दरम्यान ज्या मुंबईने हार्दिक ला ट्रोल केलं आज त्याच मुंबईकरांच स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हर च्या बाजूला बसलेला …. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या सेकंद साठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड … गरजेच्या क्षणी उभा राहणार बुम बुम बुमराह… दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत ….आणि सगळेच …. आमचा बोरिवलीकर रोहित … विराट सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता …भेटतील ते ही असे अचानक…गर्दी जमणे आणि जमवणे ह्यातील फरक पाहिला स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे. टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हाला
प्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो ” .