news

१५ हजारांची नोकरी तेंव्हाच सोडली जेंव्हा समजलं मोबाईलवरून दिवसाला ३ ते ४ हजार … अश्या फसव्या लोकांपासून लांब रहा नाहीतर

भारतात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. घरखर्च आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी युवावर्ग आणि विशेष करून महिला घरात बसून (वर्क फ्रॉम होम) च्या शोधात असतात. ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेत आज अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्रासपणे जाहिराती देऊन माझ्या सारखेच तुम्हीही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पैसे कमवू शकता अश्या जाहिराती देतात. कमेंटमध्ये yes लिहा मी तुम्हाला पैसे कसे कमावतो आणि तुम्ही देखील पैसे कसे कमवाल अश्या आशयाची हि जाहिरात देतात. पैश्याची गरज तरुण वर्गाला अश्या जाहिरातींना बळी पडण्यास भाग पाडते पण तुम्हाला माहित आहे तुमचा गैरफायदा घेऊन हेच लोक तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि मग अनेकांना ह्याचा आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.

online scam photos
online scam photos

हे लोक कमेंटमध्ये तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर मॅसेज करायला लावतात त्यांनतर तुम्ही त्यांच्यासोबत काम कस करायचं ह्यासाठी काही व्हिडिओ पाहायला सांगतात. ह्या व्हिडिओमध्ये त्यांचे काही ऑनलाईन कोर्स असतात ज्यांची फी भरून तुम्ही ते जॉईन करू शकता. विशेष म्हणजे हेच कोर्स ते आपल्याला इतरांना विकायला लावतात ज्या कोर्सची फी साधारण १० ते ५० हजारांच्या घरात असते तो कोर्स विकल्यामुळे तुम्हाला त्यातून जवळपास ५० ते ६० टक्के मिळतात आणि हीच तुमची कमाई असते. खरंतर ह्या कोर्सची कोणालाही काहीच गरज नसते पण त्यातून पैसे मिळतात ह्यामुळे हा कोर्स आपण दुसर्यांना विकत घ्यायला भाग पडतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच लोक तुम्हाला मिळालेल्या पैश्यातून तुम्ही किती ऐशो आरामात जगत आहेत तुम्ही जगभर फिरत आहेत, महागड्या गाड्यांसमोर उभे राहून व्हिडिओ, मॉल तसेच स्टारबग सारख्या ठिकाणी तुम्ही जाता असे रिल्स हे स्वतः तुम्हाला टाकायला लावतात. जेणेकरून तुम्ही आता उत्तम पैसे कमावता हे इतरांना समजेल. मुळात तस काहीही होत नाही तुम्ही इतरांना ह्यांचे कोर्स विकले तरच तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.

big scam in india
big scam in india

मग तुम्ही म्हणाल कि जर हे असं सर्रास चालू आहे मग ह्यावर कारवाई का होत नाही? अनेक तरुण ह्यात अडकले मग ते तक्रार का करत नाहीत? तर ह्यावर सध्यातरी कोणताही कायदा लागू होत नाही हा कोणत्याही प्रकारचा फ्रॉड मानला जात नाही. कारण ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची बळजबरी करीत नाहीत तुम्ही स्वतःहून त्यांच्या जाहिरातींना बळी पडलेले असता. तुम्ही स्वतःहून ते कोर्स विकत घेतलेले असतात आणि तुम्हीच स्वतःहून ते विकता देखील. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची बळजबरी केलेली नसते तुम्ही एकप्रकारे एजंटचे काम करता त्यामुळे हा सकाम असूनही ह्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. अनेक तरुण ह्या अश्या जाहिरातींना बळी पडलेले आहेत आपण खूप पैसे कमावतो हे आधी रिल्स द्वारे दाखवल्याने नाईलाजाने त्यांना हे काम पुढे चालू ठेवावे लागते. आपली हश्या होईल लोक काय म्हणतील ह्याचा विचार त्यांना मनातून काढून टाकावा लागतो. हा प्रकार खूप भयंकर आहे त्यामुळे अश्यात न पडणेच योग्य कारण बाहेर पाडण्यासाठी ह्यातून कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नसतो. जागरूक रहा सतर्क रहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button