काल जगभरात ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. आपल्या मराठी सेलिब्रिटींनीही हा सण त्यांच्या पद्धतीने साजरा केलेला पाहायला मिळाला. अगदी भूषण प्रधान, योगिता चव्हाण, क्रांती रेडकर सारखे बरेचसे सेलिब्रिटी ख्रिसमस साजरा करताना दिसले. पण हास्यजत्रा फेम ओंकार राऊत या सणामुळे मात्र ट्रोल झालेला पाहायला मिळाला. “कधी आपल्या सणांचे पोस्ट टाकलास का भावा?”…म्हणत एका युजरने ओंकारला धारेवर धरले.
पण या ट्रोलिंगला ओंकारने त्याच्या शब्दांत सडेतोड उत्तर देताना म्हटले की, “हो रे! मी जे सण साजरे करतो त्याचे photos कधी पोस्ट करतो कधी नाही! मुळात सण हा आनंद पसरवतो त्यात हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको. लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पुरणपोळी, christmas ला “santa claus” कडून येणाऱ्या gifts ची वाट बघितली आहे, ईद ला महिम ला जाऊन मालपोवा खाल्ला आहे, खूप प्रसन्नतेने गुढीपाडवा ही साजरा केलाय आणि त्याच उत्साहात ३१st december ही करतो!! म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस!!! Merry Christmas!! Santa तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो!!!”
ओंकार राऊत प्रमाणे असे बरेच मराठी सेलिब्रिटी आहेत जे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. त्यातले काही सेलिब्रिटी ट्रोलर्सना उत्तर देतात तर काही गप्प राहणे पसंत करतात. आपले सण आपण आनंदाने साजरे करतोच पण दुसऱ्या कुणाच्या सणांत जर आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे हेच त्याने म्हटलं आहे. त्याच्या ह्या उत्तरवार देखील काहीलोकांनी त्याला पुन्हा ट्रोल केलं आहे. असे हे यांना आपण show बघून प्रोत्साहन देतो… अरे त्या निर्लज्ज लोकांनी 200 वर्ष वाटोळं केल… देशाचं… सोने की चिडिया बोल जायचं देशाला… आता लोखंड सुधा भेटणं… आणि तू काय गप्पा करतो तू… आनंद पासरावतो म्हणे… 1800 ते 1947 या काळात जन्माला यायला हवा होतास तू… रक्त साडलय देश भक्तांनी या भारत भूमी साठी या तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही सांडल…. अभिमान आपल्या धर्माचा असावा…. जय हिंद जय भारत