माझ्या घटस्फोटाचा मला पश्चात्ताप होतोय, मी २० वर्षांची तेंव्हा माझं लग्न झालं आणि आमच्या वयामध्ये १२ वर्षांचं अंतर त्यामुळे
अनेक मराठी चित्रपट तसेच मराठी मालिकेत दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून रेशम टिपणीस हिची ओळख आहे. बिगबॉस मराठी मध्ये देखील तिला पाहिलं गेलं. पण रेशम नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. रेशम टिपणीस यांनी वयाच्या २० व्या वर्षी म्हणजे तिने १९९३ मध्ये अभिनेता संजीव सेठ बरोबर लग्न केले. मानव आणि ऋषिका अशी तिच्या मुलांची नावे. परंतु २००४ मध्ये तिचा घटस्फोट झाला. पुढे २०१८ पासून ती संदेश कीर्तिकरशी रिलेशनशिपमध्ये आहे.
नुकतीच दिलेल्या एका मुलखातील रेशम टिपणीस हिने माझ्या घटस्फोटाचा मला पश्चात्ताप होतोय आणि घटस्फोट होण्याबाबतचं कारण देखील सांगितलं आहे. रेशम म्हणते ” माझ्या घटस्फोटाचा मला पश्चात्ताप होतोय…. माझं लग्न झालं होतं तेव्हा मी फक्त २० वर्षांची होते. त्यानंतर मला लगेचच पहिलं मूल झालं. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मी तेवढी सक्षम आणि समजूतदार नव्हते. संजीव सेठ आणि माझ्या वयामध्ये १२ वर्षांचं अंतर आहे…. आम्हा दोघांना वाटतं की त्यावेळी जर आम्ही मॅच्युअर असतो तर आमचा घटस्फोट कधीच झाला नसता. पण आता संजीवच्या दुसऱ्या बायकोसोबत माझी छान मैत्री आहे. संदेश कीर्तिकर आणि मी गेल्या ९ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत.
इतक्यात दुसऱ्या लग्नाचा विचार आम्ही केलेला नाही. कारण लग्नानंतर फक्त एक मंगळसूत्र माझ्या गळ्यात पडणार आहे. एवढाच काय तो बदल होणार आहे. आमचं जे रिलेशन आहे ते तर तसंच राहणार आहे. त्यामुळे एवढ्यात तरी आम्ही दोघांनीही लग्नाचा विचार केलेला नाहीए”. अभिनेत्री रेशम टिपणीस हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने पहिल्या घटस्फोटावर हे मौन सोडलं आहे.